शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

२८ दिवसांत १७ कोटींचे उद्दिष्ट!

By admin | Updated: March 3, 2016 02:21 IST

मनपाच्या मालमत्ता कर विभागाची अग्निपरीक्षा.

अकोला: अकोलेकरांनी मालमत्ता कर जमा करण्यास हात आखडता घेतल्यामुळे की काय, कर वसुली करताना मनपाच्या मालमत्ता कर विभागाची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे. मार्च महिना संपण्यास अवघे २८ दिवस शिल्लक असून, या कालावधीत तब्बल १७ कोटींची कर वसुली करण्यासाठी मनपाला जिवाचे रान करावे लागणार आहे. अकोलेकरांच्या खिशातून वसूल केल्या जाणार्‍या कराच्या रकमेतून महापालिका प्रशासनाच्या वतीने मूलभूत सुविधांची पूर्तता केली जाते. मनपाकडून मूलभूत सुविधांची पूर्तता होत नसल्याची ओरड करायची आणि टॅक्स जमा करताना नाक मुरडायची, हा प्रकार थांबणे गरजेचे झाले आहे. मनपाच्या मालमत्ता कर विभागाला मार्च २0१६ पर्यंंत शहरवासीयांजवळून ३0 कोटींचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. यामध्ये गतवर्षीच्या आठ कोटींच्या थकबाकीचा समावेश आहे. कर वसूल न झाल्यास मूलभूत सुविधांवर परिणाम होण्यासोबतच मनपा कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्नदेखील गंभीर होण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थितीची जाणीव असल्यामुळे उपायुक्त सुरेश सोळसे, कर अधीक्षक विजय पारतवार कर वसुलीसाठी जंगजंग पछाडत आहेत. २ मार्चपर्यंंत १३ कोटी रुपयांचा कर वसूल झाला असून, उर्वरित १७ कोटींच्या वसुलीसाठी मनपाकडे अवघ्या २८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. प्रतिदिवस ५0 ते ५५ लाख रुपयांचा कर वसूल करण्याची अग्निपरीक्षा मनपा कर्मचार्‍यांना द्यावी लागणार आहे. त्यानुषंगाने बुधवारी मनपाच्या मुख्य सभागृहात कर वसुली विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती.आयुक्तांची करडी नजरमालमत्ता कर वसुली विभागाच्या कामकाजाकडे आयुक्त अजय लहाने यांची करडी नजर आहे. कर वसूल न झाल्यास कर्मचार्‍यांच्या वेतनाच्या समस्येत भर पडणार आहे. त्यामुळे आयुक्तांकडून या विभागाच्या कामाचा सतत आढावा घेतला जात आहे.मालमत्तांची जप्ती आणि लिलावकर जमा न करणार्‍या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचे स्पष्ट आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत. अशा बड्या करदात्यांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरु केल्याची माहिती आहे.