शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
2
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
3
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
4
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
5
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
6
जगन्नाथ रथयात्रा: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
7
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
8
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
9
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
10
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
11
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
12
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
15
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
16
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
17
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
18
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
19
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
20
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!

नायलॉन मांजावरील बंदी धाब्यावर!

By admin | Updated: January 14, 2015 01:20 IST

परराज्यातून होते आयात; न्यायालयाच्या आदेशाकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष

विवेक चांदूरकर /अकोला:न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली असली तरी शहरात चौकाचौकांत खुलेआम विक्री होत आहे. बाजारपेठेत साधा मांजाच उपलब्ध नाही. आंध्रप्रदेशातील बंगळुरु, उत्तर प्रदेशातील बरेली व दिल्ली येथील काही नामांकित कंपन्याही हाच मांजा बनवत असून, त्याची विक्री शहरात करण्यात येत आहे. शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होत आहे. न्यायालयाच्या आदेशाला झुगारून व्यावसायिक बिनधास्तपणे विक्री करीत आहेत. शहरातील सिंधी कॅम्प, जठारपेठ, तेलीपुरा व जुन्या शहरात नायलॉन मांजाची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. याच भागात पतंग विक्रीचीही अनेक दुकाने आहेत. त्यामुळे या ठिकाणी या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल होते. ह्यलोकमतह्णने नायलॉन मांजाच्या विक्रीबाबत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गैरकायदेशीर असलेल्या या मांजाची उलाढाल लाखो रुपयांची असल्याचे उघडकीस आले आहे. दुकानांमध्ये साध्या मांजाची कमी व नायलॉन मांजाचीच जास्त विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. व्यावसायिकही अव्वाच्या सव्वा भाव सांगून ग्राहकांच्या माथी हा मांजा मारतात. शहरातील व्यावसायिक पतंगीसाठी मांजा परराज्यातून एकाच वेळी बोलावितात. ट्रकमध्ये भरून मांजा आणला जातो. त्यानंतर हा माल दुकान किंवा घरांमध्ये ठेवण्यात येतो. ग्राहकांकडून नायलॉन मांजालाच जास्त मागणी असल्यामुळे व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. *.असे केले स्टिंग शहरातील तेलीपुरा, सिंधी कॅम्प, जुने शहर व जठारपेठेत नायलॉन मांजाची विक्री केली जाते. दुपारी १ वाजता लोकमतच्या चमूने तेलीपुरा भागात जाऊन नायलॉन मांजाची खरेदी केली. या ठिकाणी व्यावसायिक सर्रास मांजा खरेदी करीत असल्याचे लक्षात आले. यानंतर सिंधी कॅम्पमध्ये जाऊन नायलॉन मांजा मिळतो का, याची पाहणी करण्यात आली. या परिसरातही दुकानांमध्ये सर्रास नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. जुने शहर व जठारपेठ भागातही या मांजाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. *नायलॉनचा मांजा : स्वस्त व मजबूत म्हणूनच पसंती साधा मांजा बाजारात मिळतच नाही. त्यातही त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे पतंग उडविणारे स्वस्त व तुलनेने मजबूत असलेल्या नायलॉनच्या मांजाला पसंती देतात. नायलॉनचा मांजा लांबत असल्यामुळे पतंग लवकर कटत नाही तसेच हा मांजा एकदा खरेदी केल्यावर ठेवून दिला तरी खराब होत नाही. साध्या मांजाचा धागा दुसर्‍या वर्षी सडत असल्यामुळे तुटतो. त्यामुळे नागरिक नायलॉन मांजाला पसंती देतात. *विविध राज्यांतून ट्रकमधून होते नायलॉन मांजाची आवक दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल व आंध्र प्रदेशातून अकोल्यात नायलॉनचा मांजा आणला जातो. पश्‍चिम बंगाल व दिल्ली येथे मांजा बनविणार्‍या काही मोठय़ा कंपन्या आहेत. या कंपन्यांचा मांजा येथे ट्रकमधून आणण्यात येतो. यापैकी मोनो काइट व पांडा यांसह काही कंपन्यांच्या मांजाला अकोल्यात विशेष मागणी आहे. अकोल्यातील व्यावसायिक एकाच वेळी ऑर्डर देत असल्यामुळे ट्रकमध्ये लाखो रुपयांचा माल आणण्यात येतो. *लोकमत चमूपाठोपाठ पोलीसही पोहोचले..९0 हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त; नऊ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल४ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजावरील बंदी कायम ठेवल्याने मंगळवारी दुपारी साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात अँन्टी गुंडा स्क्वॉडने शहरात नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी ९0 हजार ५00 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आणि शहरातील नऊ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.