शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार चौकशी; अकोला वगळले!

By admin | Updated: April 3, 2017 03:37 IST

राज्यातील केवळ पाच जिल्ह्यांत चौकशीचा आदेश.

अकोला, दि. २- शालेय पोषण आहाराचा दर्जा आणि इतर गंभीर प्रकारांची चौकशी होईपर्यंत पुरवठादारांच्या देयकावरही निर्बंध लादल्याचे विधानसभेतील चर्चेत शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्ह्यात चौकशी करण्याचा आदेश दिला. त्या आदेशाला फाटा देत शालेय शिक्षण संचालकांनी केवळ पाच जिल्हा परिषदांना पत्र देऊन चौकशी अहवाल मागविला. त्यातून अकोला जिल्ह्यात खुद्द शिक्षण सभापतींनीच गंभीर तक्रारी केल्या असतानाही वगळण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सभापती पुंडलिकराव अरबट यांनी शिक्षण संचालकांकडेच तक्रार केली आहे. शालेय पोषण आहार पुरवठा निविदा प्रक्रियेत आधीच प्रचंड गोंधळ करण्यात आला. पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाने बाजारातील वस्तुदरांचा कुठलाही अंदाज न घेताच हळद, मिरची, मोहरी, कडधान्य, तेल या वस्तूंसाठी तब्बल दोनशे टक्के अधिक दराला मंजुरी दिली. हा प्रकार महाराष्ट्र को-ऑप. कंझ्युर्मस फेडरेशनला काम दिलेल्या नऊ जिल्ह्यांत प्रामुख्याने घडला. विशेष म्हणजे, कंझ्युर्मस फेडरेशनने उपविधीला धाब्यावर बसवत निविदा प्रक्रियेनंतर खासगी कंत्राटदाराला नियमबाह्यपणे कामे दिली. त्यामुळे पणन संचालकांनी थेट कंझ्युर्मस फेडरेशनने काम दिलेल्या खासगी कंत्राटदारांची देयक अदा करण्यावरच निर्बंध टाकले. अकोला जिल्ह्यात हे काम विकास ट्रेडर्स नामक खासगी कंत्राटदाराला नियमबाह्यपणे देण्यात आले आहे. त्यामध्ये निविदा प्रक्रियेतील अटी व शर्तींंचा एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भंग झाला असतानाही अकोला जिल्हा चौकशीतून वगळण्यात आल्याची माहिती आहे. विधिमंडळातील चर्चेत शिक्षणमंत्री तावडे यांनी निविदा प्रक्रियेतील अटी व शर्तींचा भंग करणे, आहाराचा दर्जा नसणे, कमी वजनाच्या प्रमाणात धान्य पुरवठा करणारांची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. ते सर्व प्रकार अकोला जिल्ह्यातही घडले आहेत. त्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी ऑगस्ट २0१६ पासून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यावर काहीच कारवाई होत नसल्याने अरबट यांनी अखेर शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांच्याकडेच तक्रार केली आहे. त्यामुळे चौकशीतून आधीच सूट देणारे संचालक आता कोणता आदेश देतात, यावरही आहार घोटाळ्य़ाला पाठबळ असणारांचे चेहरे पुढे येणार आहेत.