शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराच्या खर्च र्मयादा ७.५ टक्क्यांनी वाढली!

By admin | Updated: November 6, 2014 23:29 IST

शालेय पोषण आहाराच्या सुधारित दराला मान्यता.

बुलडाणा : प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जात असलेल्या शालेय पोषण आहार योजनेच्या खर्च र्मयादेत केंद्र शासनाने ७.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. शालेय पोषण आहार योजनेतील प्रति लाभार्थी आहार खर्च र्मयादा आतापर्यंत तीन ते पाच रुपये एवढी होती; मात्र केंद्र सरकारने २0१४-१५ या आर्थिक वर्षापासून खर्च र्मयादेत ७.५ टक्यांनी वाढ केली असून, प्रति लाभार्थी खर्च र्मयादा साडेतीन ते साडेपाच रुपये एवढी निश्‍चित करण्यात आली आहे. राज्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना ४५0 उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार दिला जातो, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७00 उष्मांक आणि २0 ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रति विद्यार्थी १00 ग्रॅम, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति दिन प्रति विद्यार्थी १५0 ग्रॅम तांदळाचा पुरवठा केला जातो.या तांदळापासून शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी अन्न शिजवण्याचे दर ६ डिसेंबर २0१३ रोजी निश्‍चित करून प्रति लाभार्थी खर्च र्मयादा ठरविण्यात आली होती. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३ रुपये ३४ पैसे, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५ रुपयांपयर्ंत प्रति लाभार्थी खर्च र्मयादा ठरविण्यात आली होती. आता केंद्र सरकारने २0१४-१५ या आर्थिक वर्षापासून या खर्च र्मयादेत ७.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. पोषण आहार योजनेसाठी केंद्र सरकार ७५ टक्के, तर राज्य सरकार २५ टक्के भार उचलणार आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही सुधारित दरास २८ ऑक्टोबर रोजी मान्यता दिलीे. सुधारित दरानुसार, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ३.५९ रुपये, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ५.३८ रुपये खर्च र्मयादा निश्‍चित करण्यात आली आहे.