शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’च्या नियोजनात गावांची संख्या वाढणार!

By admin | Updated: February 25, 2016 01:40 IST

निवड करण्यात आलेल्या १२५ गावांमध्ये झाली शिवारफेरी.

अकोला: जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात १२५ गावांची निवड करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या कामांसाठी शिवारफेरी पूर्ण करण्यात आली. तथापि मागणी लक्षात घेऊन, निकषात बसणार्‍या गावांचाही समावेश करण्यात येणार असल्याने, ह्यजलयुक्त शिवारह्ण गाव निवडीच्या नियोजनात गावांची वाढ होणार आहे.वारंवार उद्भवणार्‍या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून, गतवर्षीपासून शासनामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत गतवर्षी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील सातही तालुक्यात २00 गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत यावर्षी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यात नवीन १२५ गावांची निवड गत जानेवारीमध्ये करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये करावयाच्या जलयुक्त शिवारच्या कामांसाठी शिवारफेरी काढण्याचे कामदेखील पूर्ण करण्यात आले. तथापि जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या गावांची संख्या कमी असल्याच्या पृष्ठभूमीवर, मागणी आणि निकषात बसणार्‍या गावांचा समावेश निवड करण्यात आलेल्या गावांच्या यादीत करण्यात येणार आहे,असे संकेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिले आहेत, तसेच जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यातील गावांच्या निवडीमध्ये आणखी गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर यांच्याकडे मांडला. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामांसाठी गावे निवडीच्या नियोजनात गावांची वाढ होणार आहे.