शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात वाढतेय समलिंगींची संख्या!

By admin | Updated: August 3, 2016 01:41 IST

धक्कादायक वास्तव : १४ ते १५ वर्षांच्या मुलांचाही समावेश.

अकोला: 'समलिंगी'हा शब्द ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावतात. तोंडाला कुलूप, पण डोक्यात अनेक प्रश्नांचा भुंगा घेऊन समाजात वावरणार्‍या लोकांची संख्या कमी नाही. एखाद्या निवडणुकीत तृतीयपंथी उमेदवार उभा राहिला, की तो सेलिब्रिटी होतो, त्यांच्यामधीलच एखादी लक्ष्मी त्रिपाठी जगभराच्या व्यासपीठावर व्याख्याने देत कौतुकाने मिरविते. मात्र, समलिंगीबद्दल समाजात अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू असते. सध्याच्या काळात 'सेक्स' हा विषय चोरून बोलण्याचा राहिला नाही. शाळांमध्येही लैंगिक शिक्षण दिले पाहिजे का? या विषयी सरकार दरबारीही अनेकदा चर्चा घडल्य. त्यामुळे 'समलिंगी'चे जग कसे आहे, हे वास्तव 'लोकमत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अकोल्यातील चित्र धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. अकोल्यातील समलिंगींची संख्या ही वाढतीच असून, पंधरा वर्ष वयोगटातील कोवळी मुलेही यामध्ये असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.अकोला शहरातील बसस्थानकाचा मुत्रीघर परिसर, गांधी-नेहरू बाग, नेहरू पार्कच्या कुंपण भिंतीचा परिसर, उदय टॉकीजजवळ, आकोट फैलजवळ अशी अनेक ठिकाणं समलिंगींचा अड्डा बनली आहेत. शहरासह जिल्हाभरात तब्बल तीन हजारांपर्यंत समलिंगी लोकांची ह्यसाखळीह्ण बनली आहे. यापैकी ६१५, तर नियमित समुपदेशन घेत असल्याची अधिकृत माहिती आहे.या समलिंगीमध्ये महाविद्यालयात शिकणार्‍या तरुणांपासून तर थेट चाळिसीच्या पार झालेल्यांचाही समावेश आहे. यांच्यामधीलच एकाला समलिंगीच्या विश्‍वाबाबत बोलते केले असता, त्याने सध्या तारुण्याच्या उंबरठय़ावर आलेल्यांची समलिंगीमध्ये भर पडत असल्याचे सांगितले. हे गृहस्थ सध्या ४५ च्या घरात आहेत. अजाणत्या वयामध्येच मी यामध्ये गोवल्या गेलो व आता सवय झाली. घरी संसार आहे, मुले मोठी झाली, पण सवय कायम असल्याचे ते म्हणाले. आम्ही पुरुषच आहोत, पौरुष कुठेही कमी नाही, तुम्हाला सांगितले म्हणून कळले तरी कोणाला शंकाही येत नाही. ह्यअनैसर्गिकह्ण म्हणून शिकलेली मंडळी आमच्यावर टीका करतात, पण आमच्यासाठी काहीही अनैसर्गिक नाही आमची भूक आम्ही भागवतो, अशा शब्दात त्यांनी पांढरपेशा मानसिकतेवर ताशेरे ओढले. *समलिंगीमध्ये ही आहेत तीन प्रकारसमलिंगी संबंध ठेवणार्‍या व्यक्तीच्या वर्तनावरून त्यांचे कोती, पंथी व डबलडेकर असे तीन प्रकार पाडले आहेत.अकोल्यात कोतीचे प्रमाण हे वाढते आहे.कोती म्हणजे संबंधामध्ये जो पुरूषाच्या भूमिकेत असतो.पंथी म्हणजे जो स्त्रीच्या भूमिकेत राहतो. डबलडेकर म्हणजे जो दोन्ही भूमिकेत असतो.