शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडणा-यांची संख्या अधिक

By admin | Updated: December 16, 2014 01:19 IST

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिका-यांची माहिती.

अकोला : राज्यात गेल्या तीन वर्षांत रेल्वे मार्गावर घडलेल्या अपघातांमध्ये १0,४३८ जणांचा मुत्यू झाला. यापैकी ५,२३१ अपघात हे रूळ ओलांडताना झाले असून, ५५ टक्के घटना या रूळ ओलांडताना घडल्याचे आढळून आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.राज्याची ह्यजीवनवाहिनीह्ण म्हणून ओळखल्या जाणार्‍या मध्य रेल्वे मार्गावर सर्वाधिक मृत्यू हे रूळ ओलांडताना झाल्याची नोंद रेल्वे प्रशासनाच्या लेखी झाली आहे. रेल्वे मार्गावर गेल्या तीन वर्षांत १0 हजार ४३८ अपघाती मृत पावणार्‍यांपैकी ५ हजार २३१ अपघात केवळ रूळ ओलांडताना झाले आहेत. यात बहुतांश मृत्यू रेल्वे स्थानकावर एका प्लॅटफार्मवरून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर रूळ ओलांडताना आणि रेल्वे कर्मचारी तैनात नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर झाले आहेत. मानसिकता कारणीभूतराज्यात अनेक ठिकाणी अघोषित रेल्वे क्रॉसिंग निर्माण झालेले आहेत. बहुतांश स्थानकांवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक पूल आहेत. रेल्वे प्रशासनानेदेखील अनेक ठिकाणी प्रवाशांना धोका न पत्करण्याबाबत सूचना फलक लावले आहेत. असे असतानाही पुलांचा वापर न करता सर्रास रेल्वे रूळ ओलांडण्याचे प्रकार नागरिक करीत आहेत. संरक्षक भिंतींनादेखील छेद देत नागरिकांनी छुपेमार्ग निर्माण केले असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना घडणार्‍या अपघातांचे प्रमाण राज्यातील रेल्वे स्थानकांवर सर्वाधिक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे; तसेच ठिकठिकाणी राज्यात रेल्वे मार्गालगतच्या गावकर्‍यांनी अघोषित रेल्वे क्रॉसिंग निर्माण केले आहेत. अशा ठिकाणी रूळ ओलांडताना अपघात घडल्याच्या घटनादेखील अधिक असल्याने नागरिकांनी मानसिकता बदल्याची गरज असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळ अधिकार्‍यांनी दिली.