शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोविड पॉझिटिव्ह अहवालांची संख्या घटली; मृत्यूचा आलेख मात्र चढताच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 10:37 IST

CoronaVirus in Akola आठ दिवसांत १३ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागासमोरील आव्हान कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गत सहा महिन्यांत जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इतर महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर महिना सर्वाधिक घातक ठरला. त्या तुलनेत आॅक्टोबर महिन्याची सुरुवातही गत महिन्यासारखीच झाली; पण गत आठ दिवसांत कोविड पॉझिटिव्ह अहवालांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. असे असले तरी मृत्यूचे सत्र कायम असून, मागील आठ दिवसांत १३ जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागासमोरील आव्हान कायम आहे.सप्टेंबर महिन्यात दिवसाला सरासरी दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू, तर शंभरपेक्षा जास्त अहवाल पॉझिटिव्ह आले. तुलनेने आॅक्टोबर महिन्याची सुरुवात दिलासादायक झाली. मागील आठ दिवसांत २३६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दररोज तपासण्यात येणाऱ्या अहवालांमध्ये पॉझिटिव्ह अहवालाची संख्या घटली आहे. शिवाय, बरे होणाºया रुग्णांची संख्याही वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ८६.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे अकोलेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला; मात्र दुसरीकडे मृत्यूचे सत्र कायम आहे. सप्टेंबर महिन्याप्रमाणेच आॅक्टोबर महिन्यातही दिवसाला सरासरी दोघांचा मृत्यू होत आहे. मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान असले, तरी सर्वसामान्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. अनेक जण याकडे दुर्लक्ष करून बेफिकिरीने वागतात.

उशिरा उपचार ठरतोय घातक!व्हायरल फिव्हर की, कोरोना यात संभ्रम असल्याने अनेक रुग्ण त्रास जास्त वाढल्यावर कोरोनाचा उपचार घेत आहेत. उपचार सुरू होईपर्यंत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होणे, शरीरातील आॅक्सिजनची पातळी खालावणे आदी गंभीर समस्या जाणवू लागतात. हा प्रकार जीवघेणा ठरतो.

पॉझिटिव्ह येणाºया रुग्णांचे प्रमाण घटले, तरी बेफिकिरी करून चालणार नाही. लक्षणे दिवसताच पाच दिवसांच्या आत रुग्णांनी चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. कुठलाही आजार अंगावर काढू नये.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला