शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची संख्या वाढली, बॅलेट युनिट पडले कमी

By admin | Updated: October 3, 2014 02:00 IST

अकोला जिल्ह्यातील मतदार केंद्रांसाठीआणखी एक हजार युनिटची मागणी.

अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अकोला पश्‍चिम वगळता इतर चार मतदारसंघात उमेदवारांची संख्या पंधरापेक्षा जास्त आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांसाठी १ हजार २८ ह्यबॅलेट युनिटह्ण लागणार आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे (सीईओ) गुरुवारी बॅलेट युनिटची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील उमेदवारांचे चित्र १ सप्टेंबर रोजी स्पष्ट झाले. त्यामध्ये अकोला पूर्व २५, अकोला पश्‍चिम १५, आकोट १८, बाळापूर १६ आणि मूर्तिजापूर मतदारसंघात १९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान प्रक्रियेत मतदान यंत्रांच्या ह्यबॅलेट युनिटह्णवर एकूण १६ बटण असतात, त्यामध्ये १५ उमेदवारांच्या नावांसमोरील बटणांसह १६ व्या क्रमांकावर ह्यनोटाह्णचे बटण असते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी उपलब्ध एकूण १ हजार ८३९ बॅलेट युनिटपैकी १ हजार ३६७ बॅलेट युनिट यापूर्वी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात वितरित करण्यात आले. उर्वरित ४७२ बॅलेट युनिट जिल्हा निवडणूक विभागाकडे आरक्षित आहेत; मात्र अकोला पश्‍चिम मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील अकोला पूर्व, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार म तदारसंघात उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघात मतदान प्रक्रियेत दुप्पट ह्यबॅलेट युनिटह्ण लागणार आहेत. त्यासाठी १ हजार २८ बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत गुरुवारी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे पत्राद्वारे करण्यात आली.