शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

राष्ट्रसंतांचे विचार साहित्य संमेलन हे आता कृती संमेलन व्हावे- हरिभाऊ वेरूळकर

By admin | Updated: December 14, 2014 23:42 IST

‘है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो.’ या शांतीपाठाने अकोला येथील संमेलनाचा समारोप.

अकोला : राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाची रविवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी सर्वधर्मीय प्रार्थनेने सांगता झाली. प्रारंभी एकात्मतेचा मंत्र देणार्‍या सर्वधर्मीय प्रार्थना झाल्या. यानंतर हजारो नागरिक आणि गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ह्यहै प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो..ह्ण हा शांतीपाठ झाला. राष्ट्रभक्ती आणि शांततेचा मंत्र देणार्‍या या प्रार्थनेमुळे परिसर मंत्रमुग्ध झाला होता. त्यानंतर समारोप्रसंगी बोलताना संमेलनाध्यक्ष हरिभाऊ वेरूळकर यांनी राष्ट्रसंतांचे विचार साहित्य संमेलन हे आता कृती संमेलन झाले पाहिजे,असे विचार व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुधाकरराव गणगणे होते. संमेलनाध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरूळकर, स्वागताध्यक्ष डॉ. गजानन नारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. ज्या महानुभावांचे संपूर्ण राज्यात नाव आहे, त्यांनी या तीन दिवसीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनात परिसंवादाच्या माध्यमातून आपणास विचारांची शिदोरी दिली. ही शिदोरी सोबत नेल्यानंतर तिचे कृतीत रूपांतर करण्याची खरी गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी गणगणे यांनी केले. संमेलनाध्यक्ष म्हणून बोलताना आचार्य हरिभाऊ वेरूळकर म्हणाले की, साहित्य संमेलनाचे वेगवेगळे प्रवाह आहेत. राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन हे सर्व संतांच्या विचारांचे व्यासपीठ असून, सर्व संतांचा आदर्श म्हणजे ग्रामगीता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विविध परिसंवाद व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रसंतांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण आता राष्ट्रसंतांचे विचार साहित्य संमेलन कृती संमेलन व्हावे, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आभार डॉ. गजानन नारे यांनी मानले.