शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात ‘नरेगा’ची कामे ठप्प!

By admin | Updated: June 6, 2015 01:03 IST

जिल्हा परिषदेच्या सहा हजार अभियंत्यांचा कामावर बहिष्कार; ठोस निर्णय होईस्तोवर आंदोलन.

सुनिल काकडे /वाशिम : राज्यातील सुमारे ६ हजार जिल्हा परिषद अभियंत्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांवर बहिष्कार टाकल्यामुळे राज्यभरात ह्यनरेगाह्णची सर्वच कामे ठप्प झाली आहेत. रोजगार हमी योजनेची सन २00५ मध्ये महाराष्ट्रात मुहूर्तमेढ रोवल्या गेली. या कामांवर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची मदत घेण्यात यावी आणि स्वतंत्र यंत्रणा उभारल्यानंतर या अभियंत्यांना त्यांची मूळ कामेच सोपविल्या जावी, असे शासनाचेच निर्देश होते. मात्र, योजना सुरु होवून १0 वर्षाचा मोठा काळ उलटल्यानंतरही शासनाने दिलेला शब्द पाळला नाही. यामुळे संतप्त झालेल्या राज्यभरातील ६ हजार अभियंत्यांनी १८ मे २0१५ पासून ह्यनरेगाह्णच्या सर्वच कामांवर राज्यव्यापी बहिष्कार टाकला आहे. अभियंत्यांच्या या आंदोलनात्मक पावित्र्यामुळे आजमितीस ह्यनरेगाह्णअंतर्गत राबविण्यात येणारी जवाहर विहिर योजना, फळबाग लागवड, जुन्या राज्य रोजगार हमी योजनेतील प्रगतीपथावरील अपूर्ण कामे यासह मातीनाला बांध, मातीबांध, सिमेंट नालाबांध, ढाळीचे बांध, कम्पार्टमेंट बांध, जैविक बंधारा, खार जमिन विकास बंधारा, गॅबियन बंधारे, वनराई बंधारे, सलग समतल चर, फळबाग लागवड, तुतीची लागवड, सिंचन विहिरी, सिंचन विहिरींची दुरुस्ती व गाळ काढणे, कालव्यांमधील गाळ हटविणे, सफाई, अस्तरीकरण व नुतनीकरण, पाटचर्‍या दुरुस्ती, मातीचे कालवे, नदी/नाला पुनरुज्जीवन यासह पांदन रस्ते, अंतर्गत रस्ते यासह उभारल्या जाणार्‍या इमारतींची कामे पूर्णत: बंद पडली आहेत. कामांमधील तांत्रिक बाबी तपासण्याची मुख्य जबाबदारी असणारे अभियंतेच कामावर पाय ठेवायला तयार नसल्यामुळे ह्यनरेगाह्णच्या यशावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये अभियंत्यांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे आहे, त्या अधिकार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी ह्यनरेगाह्णच्या कामांकडे लक्ष देणे बंद केल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर जलसंधारणाची कामे, सिंचन विहिरी, वृक्षलागवड यासह पांदन रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची कामे अचानक ठप्प झाली असून या कामांकडे सद्या मजूरही फिरकेनासा झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. शासनाने यासंदर्भात सुवर्णमध्य काढून रखडलेली तद्वतच बंद पडलेली कामे पुर्ववत सुरु करावीत, अशी मागणी जोर धरत आहे.