शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण मुक्तीसाठी तालुकास्तरावर ‘एनआरसी’ नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 14:46 IST

अकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे

- प्रवीण खेतेअकोला: राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर आहे. विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात ही समस्या वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी जिल्हास्तरावर एकच पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) आहे. ग्रामीण भागात ‘व्हीसीडीसी’ अकार्यक्षम ठरत असल्याने कुपोषण मुक्तीचा हा लढा तोकडा ठरत असून, राज्यभरात तालुकास्तरावर एनआरसी केंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहेदुर्गम आणि आदिवासी भागासह शहरी भागातही कुपोषणाचे लोण पसरत आहे. यावर मात करण्यासाठी पोषण आहार उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत जिल्हास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्र आहे; मात्र रोजगार बुडवून येथे मुलांना ठेवणे ग्रामीण भागातील पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे पालकही या ठिकाणी येण्यास नकार दर्शवितात. ग्रामीण भागात ‘व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’ म्हणजेच व्हीसीडीसी आहेत; मात्र त्यांचे कार्य प्रभावी नाही, अशा परिस्थितीत कुपोषणाचा लढा तोकडाच ठरत आहे. त्यामुळे किमान तालुकास्तरावरदेखील एनआरसी केंद्र आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.काय आहे ‘एनआरसी’ केंद्रकुपोषित बालकांना निगराणीत ठेवून त्यांना आवश्यक पोषण आहार देऊन या बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकासासाठी पोषण पुनर्वसन केंद्र राज्यात जिल्हास्तरावर कार्यरत आहे. यामध्ये कुपोषित बालकांना १४ दिवसांसाठी डॉक्टरांच्या निगराणीत ठेवले जात असून, या कालावधीत कुपोषित बालकांच्या वजनात किमान १५ टक्क्यांची वाढ केली जाते. पोषण आहारासोबतच कुपोषित बालकांच्या बौद्धिक विकासासाठीही विविध प्रयत्न केले जातात.दुर्गम भागात ‘एनआरसी’ पोहोचलेच नाहीबहुतांश ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम भागात पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक ती माहिती पोहोचली नाही. शिवाय,राज्यभरात केवळ जिल्हास्तरावर एनआरसी आहे. त्यामुळे या ठिकाणी १४ दिवसांचा मुक्काम ग्रामीण भागातील पालकांना परवडणारा नाही. म्हणूनच या ठिकाणी येण्यास पालकांचा नकार असतो. अनेकांसाठी गाव सोडून शहरात येणेही शक्य नसल्याने ते याकडे दुर्लक्ष करतात.ग्रामीण स्तरावर प्रभावी उपाययोजनांची गरजशहरी भागात विशेष सुविधा आहे; मात्र त्या ग्रामीण भागात पोहोचत नाहीत. त्यामुळे किमान तालुकास्तरावर पोषण पुनर्वसन केंद्राची आवश्यक आहे. यासाठी शासनातर्फे प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.हे आहेत ‘एनआरसी’चे फायदे

  • बालकांचे वजन वाढण्यासाठी योग्य पोषण आहार
  • शारीरिक विकासासोबत बौद्धिक विकास
  • मातांना पौष्टिक पाककृतीचे प्रशिक्षण

कुपोषण मुक्तीसाठी ‘एनआरसी’ची महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये बालकांच्या शारीरिक विकासासोबतच बौद्धिक विकासावरही विशेष लक्ष दिले जाते. या ठिकाणी प्रत्येक कुपोषित बालक पोहोचावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य