शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

न.प. कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी पदाची संधी मिळणार!

By admin | Updated: May 22, 2017 01:30 IST

सहा वर्षांनंतर जिल्हाबाह्य होणार बदली

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : नगर परिषद कर्मचाऱ्यांना विभागांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून थेट मुख्याधिकारी पदावर काम करण्याची संधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांची दर तीन वर्षांनी जिल्ह्यात, तर सहा वर्षांनंतर जिल्हाबाह्य बदली करण्यात येणार असून, त्यासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार नगरविकास प्रशासन संचालकांना देण्यात आले आहेत. शासनाने नगरविकास प्रशासन संचालकांना बदल्याचे अधिकार दिले आहेत. कायद्याप्रमाणे प्रशासन चालण्यासाठी संवर्ग कर्मचाऱ्यांच्या एका नगरपरिषदेत तीन वर्ष जिल्ह्यात सहा वर्षांची सेवा राहणार असल्याने अनेक सेवानिवृत्तीच्या मार्गावरील कर्मचाऱ्यांची जिल्हाबाह्य बदली होणार आहे. यातच शासनाने राज्यस्तरीय संवर्गातून मुख्याधिकारी श्रेणी २ (गट ब) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्तीची संधी दिली आहे. न. प. मुख्याधिकारी पदासाठी राज्यस्तरीय संवर्गात सात वर्ष नियमित सेवा, वय ४५ वर्षांपेक्षा कमी व पदवीधर असलेले कर्मचारी पात्र ठरणार आहेत. राज्यातील नगरपालिकांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बिंदूनामावली स्थानिक पातळीवरच ठरून कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात होती. कर्मचाऱ्यातून अधिकारी झाल्यावर वर्षानुवर्षे एकाच नगरपालिकेत नोकरी करणाऱ्यांना शासनाकडून चाप बसणार आहे. एकाच नगरपालिकेत तीन वर्ष काम केल्यानंतर जिल्ह्यात, तर सहा वर्ष नोकरी झाल्यानंतर जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येणार आहे. दर तीन वर्षांनी दुसऱ्या नगरपरिषदेत बदली असल्याने पूर्वी लागलेल्या नगरपालिकेतच सेवानिवृत्ती हे धोरण बदलणार आहे. संवर्गातूनच पदोन्नतीने विभागीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करून कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी या उच्च पदावर काम करण्याची संधी शासनाने दिली आहे.