शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
3
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
4
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
5
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
6
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
7
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
8
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
11
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
12
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
13
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
14
लेकाला मांडीवरुन घेऊन कार्तिकीचा केला गाण्याचा सराव, शेअर केला क्युट व्हिडिओ
15
"माझी मुलगी आधी एअर इंडियात पायलट होती...", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अलका कुबल म्हणाल्या...
16
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
17
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
18
BEL Stock Price: 'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
19
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
20
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

आता शाळांमध्येही महिला तक्रार निवारण कक्ष

By admin | Updated: January 16, 2015 23:59 IST

(निवृत्त) न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशी.

कारंजा (जि.वाशिम) : महिलांवरील अत्याचार रोखण्याच्या दृष्टिने राज्यातील सर्व शाळांमध्ये महिलांसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश शासनाने गुरूवारी दिले आहेत. राज्य शासनाच्या १ मार्च २0१0 रोजीच्या निर्णयानुसार महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (नवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. राज्यातील प्रत्येक शाळेत महिला तक्र ार निवारण कक्ष स्थापन करणे, तसेच न्यायालय स्तरावर, ग्रामपातळीवर शाळा, महाविद्यालय स्तरावर व औद्योगिक आस्थापनांमध्ये महिलांक रीता तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या शिफारशी या समितीने केल्या होत्या. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, अध्यापक विद्यालये, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्यानंतर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशी विचारात घेऊन शिक्षण संचालकांना राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची कारवाई तत्काळ करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आणि जिल्हय़ातील माहिती एकत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागीय उपसंचालकांनी विभागीय स्तरावरील माहिती शिक्षण संचालकांना आणि शासनाला सादर करावी, असेही आदेशात म्हटले आहे. शिक्षण संचालक राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याच्या कारवाईचा आढावा घेऊन तसा अहवाल शासनाला पाठवतील.