शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता काय जखमांवर मीठ चोळायला आले ?

By admin | Updated: April 24, 2015 02:13 IST

कापशी येथील संतप्त ग्रामस्थांचा आयजींना सवाल

मंगेश च-हाटे / कापशी (जि. अकोला): कापशी गावामध्ये अनेक वर्षांपासून जुगार चालतो. आजपर्यंतही पोलिसांनी जुगारावर छापा टाकला नाही. अक्षय्यतृतीयेच्या दिवशी छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या आरोपींना अटक करण्याऐवजी निष्पाप ग्रामस्थांना खाकी वर्दीचा धाक दाखवत अमानुष मारहाण केली. यात अनेक महिला, पुरुष जखमी झाले. पोलीस कायद्याचे रक्षक आहेत की भक्षक? पोलिसांनी मारहाण करायची, आमच्या मुलाबाळांना, लेकी-सुनांना जखमी करायचे; आता काय पोलीस विशेष महानिरीक्षक आमच्या जखमांवर मलम लावायले आले, असा संतप्त सवाल कापशी ग्रामस्थांनी आयजी चंद्रकांत उघडे यांना केला. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकांत उघडे यांनी गुरुवारी कापशी गावाला भेट देऊन ग्रामस्थांची चौकशी केली. चौकशीदरम्यान संतापलेल्या ग्रामस्थांनी आयजींवर प्रश्नांचा चांगलाच भडीमार केला. ग्रामस्थांचा संताप आणि आक्रोश पाहून आयजी उघडेही गोंधळून गेले होते. ग्रामस्थ अजाबराव पाटील चतरकर, वसंत पाटील चतरकर, सूर्यभान राठोड, रामदास गावंडे, दगडू मानतकर, गोकर्णाबाई मानतकर, आशाबाई तायडे, मनोहर येवले, नीलेश पाटील चतरकर, अन्नपूर्णा चतरकर, कल्पना गजानन पारखडे, जयश्री दत्ता पारखडे, पुरुषोत्तम चतरकर आदींच्या घरी आयजी चंद्रकांत उघडे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जाऊन चौकशी केली. या ग्रामस्थांनी त्यांच्या मोटारसायकली, कारची केलेली नासधूस आणि घरातील दरवाजे, खिडक्या व वस्तूंची केलेली तोडफोड, महिला, पुरुषांसोबतच गुराढोरांना केलेली मारहाणही आयजी उघडे यांना दाखविली.पोलीस गुंडांवर कारवाई करीत नाहीत आणि स्वत:च गुंडगिरी करून निष्पाप ग्रामस्थांना मारहाण करतात. पोलिसांच्या मारहाणीत अनेकजण जखमी झाले. पोलिसांनी जुगार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी ग्रामस्थांना वेठीस धरल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आयजी उघडेंकडे मांडल्या.