शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आता वर्ग १ ते १२ चा अभ्यासक्रम तयार करणार एकच समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2016 02:00 IST

अभ्यासक्रमात येणार सुसूत्रता.

विवेक चांदूरकर/ वाशिम : आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकचा शालेय अभ्यासक्रम तीन वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. आता मात्र एकच समिती वर्ग एक ते बारापर्यंतचा अभ्यासक्रम तयार करणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता व एकवाक्यता आणण्यास मदत होणार आहे. राज्यात शालेय अभ्यासक्रम अभ्यास मंडळाच्यावतीने तयार करण्यात येतो. या अभ्यासक्रमात ठराविक कालावधीनंतर बदल करण्यात येतो. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण विभागाने शालेय अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम तयार करीत असताना किंवा अभ्यासक्रमात बदल करीत असताना आतापर्यंत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. त्यामुळे पहिली ते चौथीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पाचवीचा अभ्यासक्रम हा वेगळा असायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे दहावीनंतर अकरावी व बारावीचा अभ्यासक्रम वेगळा राहत होता. त्यामुळे पुन्हा विद्यार्थी संभ्रमात पडत होते. त्यामुळे अभ्यासक्रमात सुसूत्रता आणण्याकरिता आता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम एकच समिती गठीत करणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमात सुसूत्रता येणार असून, विद्यार्थ्यांना सलग शिक्षण घेणे सोपे होईल, तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासही मदत होईल. आतापर्यंत प्राथमिक व माध्यमिकचा अभ्यासक्रम वेगवेगळ्या समित्या तयार करीत होत्या. आता मात्र वर्ग १ ते १२ पर्यंतच्या शिक्षणाकरिता एकच समिती तयार करण्यात आली असून, यात विविध तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती आपसामध्ये समन्वय ठेवून अभ्यासक्रम तयार करणार असल्याचे शिक्षण विभागाचे सचिव नंदकु मार यांनी सांगीतले.विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती अभ्यासक्रम तयार करण्याकरिता त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व तज्ज्ञांमध्ये समन्वय असणार आहे. या समन्वयातूनच सलग व मागील वर्गातील अभ्यासक्रमाशी निगडित अभ्यासक्रमच पुढील वर्गात दिला जाणार आहे.