शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साहित्य संमेलनातील विचारमंथनावर आता कृतीची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 02:50 IST

भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्‍या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्‍यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.

ठळक मुद्देसत्यपाल महाराज यांचे आवाहन राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचा समारोप

नीलिमा शिंगणे - जगड । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:(स्व.श्रीरामजी भाकरे महाराज साहित्य नगरी) - अलीकडच्या काळात भंडारा देण्याची पद्धत फोफावली आहे. कार्य कोणतेही असो दिला भंडारा. एवढेच नव्हेतर सामाजिक आंदोलने यशस्वी करायचे असेल तरीही हल्ली लोकप्रतिनिधी भंडारा देतात. जेथे जेवण ते आंदोलन कधी फेल पडत नाही. मात्र, राष्ट्रसंतांच्या विचार साहित्य संमेलनात गर्दी होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्‍या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्‍यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलाच्यावतीने आयोजित ‘जगाचा पोशिंदा बळीराजा’ला सर्मपित पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन-२0१७ च्या समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून सत्यपाल महाराज बोलत होते. दोन दिवसीय या संमेलनाचा समारोप रविवारी झाला. यावेळीविचारपीठावर स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते कृष्णा अंधारे, प्रमुख मार्गदर्शक गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरू ळकर गुरुजी, आजीवन प्रचारक डॉ.भास्करराव विघे तसेच माजी मंत्री गुलाबराव गावंडे, उद्योजक गंगाधर पाटील, महाराष्ट्र राज्य आणि गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष अँड.  मोतिसिंह मोहता, ज्ञानेश्‍वर साखरकर विराजमान होते. सत्यपाल महाराज यांनी नेहमीच्याच परखड शैलीत चुकीच्या प्रथा परंपरावर आसूड ओढत, शेतकरी जगला तर देश जगेल हे केवळ शब्दांपुरते र्मयादीत ठेवू नका, शेतकर्‍यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल, आत्महत्या थांबतील अशा विचारांची कृतीची गरज असल्याचे प्रतिपादीत केले. माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी सांगितले, की सत्ता आणि सत्य जेव्हा जवळ येईल, तेव्हाच देशाची प्रगती होईल. समाज जागृत आहे, पण शासन जागृत नाही.  असा आरोप केला.  कृष्णा अंधारे यांनी सरकार कुठलेही असो शेतकर्‍यांचे शोषण पूर्वीपासूनच होत आहे. याचे उदाहरण द्यायचे म्हणजे सिलिंग कायदा. यामुळे अनेक सधन शेतकरी आज भूमिहिन झाले असल्याची खंत व्यक्त केली.  भास्करराव विधे यांनी राष्ट्रसंतांचा विचार पूर्ण झाला, असे अजिबात नाही. फक्त त्यांच्या साहित्यातील काही मोतीच याठिकाणी सापडलेत. सागर रिकामा झाला नाही, असे  प्रतिपादन केले.  साहित्य संमेलनाला महाराजांच्या श्रद्धेने आणि विचारांनी पेटलेली माणसेचं आलेली आहेत. ग्रामगीतेचा विचार हा प्रयोगशील आहे. केवळ ग्रामगीतेला किंवा तुकडोजी महाराजांना मी मानतो, असे मानण्याने ज्ञान मिळत नाही, तर ती समजून घेण्याने ज्ञान मिळत असते, असे ज्ञानेश्‍वर साखरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजAkola cityअकोला शहर