शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आता महात्मा फुले जनआरोग्य योजना

By admin | Updated: April 24, 2017 01:56 IST

विद्यमान योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ : जिल्ह्यात १ एप्रिलपासून योजना लागू

अकोला: सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार सेवा पुरविणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नामकरण आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याने दरम्यानच्या काळात लाभार्थींच्या विमा संरक्षणात खंड पडू नये, यासाठी विद्यमान राजीव गांधी जीवनदायी योजना १ एप्रिल ते ३० जून २०१७ या कालावधीत ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावाने सुरू ठेवण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. राजीव गांधी जीवदायी आरोग्य योजना राज्यात २ जुले २०१२ रोजी आठ जिल्ह्यात सुरू झाली होती. त्यानंतर उर्वरित २७ जिल्ह्यांमध्ये २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना सुरू करण्यात आली. शेवटच्या घटकापर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या योजनेसाठी एक लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब पात्र आहेत. या योजनेत पात्र लाभार्थींसाठी निवडलेल्या ९७१ आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. यासाठी राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय व खासगी रुग्णालये अंगीकृत करण्यात आली आहेत. यासाठी महाराष्ट्र शासन विमा हप्ता भरत असल्यामुळे निवडक आजारांसाठी पात्र लाभार्थींना निवडक रुग्णालयांमध्ये कोणतीही रक्कम न देता उपचार घेता येतात. दरम्यान, १ एप्रिल २०१७ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना ही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य या नावाने राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तथापि, सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यानच्या काळात काळात लाभार्थींच्या विमा संरक्षणात खंड पडू नये, यासाठी विद्यमान राजीव गांधी जीवनदायी योजना १ एप्रिल ते ३० जून २०१७ या कालावधीत ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावाने सुरू राहणार आहे. त्यानंतर ही योजना संपूर्णपणे नव्या रूपात अस्तित्वात येणार आहे. जिल्ह्यात १५ रुग्णालये अंगीकृतराजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून अकोला जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २ शासकीय व १३ खासगी अशी एकूण १५ रुग्णालये अंगीकृत केली आहेत. आतापर्यंत १२,५८४ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी ४० कोटी ९३ लाख ३४ हजार ८८ रुपये मंजूर झाले आहेत.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलल्याने ती आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना या नावाने ओळखली जाईल. योजनेचे स्वरूप मात्र कायम आहे. पात्र लाभार्थींनी या योजनेची योग्य माहिती घेऊन तिचा लाभ घ्यावा. - डॉ. सुनील वाठोरे, जिल्हा समन्वयक अधिकारी, अकोला