शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आता एसटीत मिळणार तक्रार पुस्तिका!

By admin | Updated: January 17, 2015 00:05 IST

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी वाहकावर सोपवली जबाबदारी.

अकोला : प्रवासात एसटीच्या सेवेबाबत कुठलीही तक्रार असेल, तर आता बसस्थानक येण्याची वाट पाहण्याची गरज यापुढे भासणार नाही. कारण प्रवाशांना तक्रार देण्यासाठी आता एसटीमध्येच तक्रार पुस्तिका उपलब्ध करुन देण्यात येणार असून, वाहकावर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियमाचा भंग करणार्‍या वाहकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळातील सूत्रांनी सांगितले. खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी राज्य परिवहन महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्याअनुषंगाने एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास तक्रार नोंदवण्यासाठी वाहकाकडे तक्रार पुस्तिका ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या अडचणी तत्काळ सोडविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. वाहकाने प्रवाशास तक्रार पुस्तिका उपलब्ध न केल्यास प्रवासी आगारात पोहोचल्यानंतर वाहतूक नियंत्रक कार्यालयातील पुस्तिकेत तक्रारीची नोंद करू शकतील.तक्रार पुस्तिकेचे जतन करण्याची जबाबदारी वाहकालाच देण्यात आली आहे. पुस्तिका हरविल्यास त्यांना कारवाईस सामोरे जावे लागेल आणि दंडवसुलीनंतर तत्काळ पर्यायी तक्रार पुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवासी आणि एसटी महामंडळातील संवाद वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ही योजना धुळे विभागात अलिकडेच राबविण्यात आली. आता राज्यातील सर्व विभागांमध्ये ही योजना सुरू होणार आहे. राज्य परिवहन महामंडळातील केंद्रीय अधिकार्‍यांनी याबाबत राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना आदेश दिले आहेत. दरम्यान वाहकांना सूचना व तक्रार पुस्तिका देण्यात येणार असल्याचे अकोला विभागाचे नियंत्रक ए एम सोले यांनी स्पष्ट केले. या योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी करण्यासाठी अकोला विभागातील सर्व आगार व्यवस्थापकांना व वाहकांना निर्देश दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.