शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता ऑनलाइननेच भाजपा सरकार घरी पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:33 IST

तेल्हारा : उडीद, मूग पिकाचे हमीभाव खरेदी करण्यासाठी भाजप  सरकारने ऑनलाइन अर्ज करण्याचे ठरविले आहे. सरकारने  आता ऑनलाइन शेतकर्‍यांना रांगेत उभे करण्याचे ठरविले  आहे. जेवढा वेळ पती-पत्नी यांना ऑनलाइन पीक कर्जाच्या  अर्जासाठी दिला तेवढा वेळ स्वत:च्या लग्नातसुद्धा उभे राहिले  नाही. एवढी बिकट परिस्थिती सरकारने शेतकर्‍यांवर आणली  आहे,असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू  कडू यांनी केले.  तेल्हार्‍यात भव्य रोगनिदान शिबिर व शेतकरी  मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या  मेळाव्यात ते बोलत होते. 

ठळक मुद्देप्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू तेल्हार्‍यात रोगनिदान शिबीर, शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : उडीद, मूग पिकाचे हमीभाव खरेदी करण्यासाठी भाजप  सरकारने ऑनलाइन अर्ज करण्याचे ठरविले आहे. सरकारने  आता ऑनलाइन शेतकर्‍यांना रांगेत उभे करण्याचे ठरविले  आहे. जेवढा वेळ पती-पत्नी यांना ऑनलाइन पीक कर्जाच्या  अर्जासाठी दिला तेवढा वेळ स्वत:च्या लग्नातसुद्धा उभे राहिले  नाही. एवढी बिकट परिस्थिती सरकारने शेतकर्‍यांवर आणली  आहे,असे प्रतिपादन प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू  कडू यांनी केले.  तेल्हार्‍यात भव्य रोगनिदान शिबिर व शेतकरी  मेळाव्याचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. या  मेळाव्यात ते बोलत होते.   या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून संस्थापक आमदार बच्चू  कडू तर अध्यक्षस्थानी मूलचंद राठी हे होते. मंचावर प्रहार  जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेश पाटील खारोडे,  जनार्दन पाटील, शंभुराजे मालक्षणे, विठ्ठलराव खारोडे, दत्ता  महाराज पागधुणे, बाळाभाऊ शेरेकर, डॉ. अभय पाटील, डॉ.  अनंत शेवाळे, विक्की मल्ल, शेखर भुजबले हे उपस्थित होते. इथे  उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मोठय़ा ऑपरेशनची,  शस्त्रक्रियेची गरज भासल्यास पूर्ण खर्च प्रहार संघटना करेल,  असे बच्चू कडू यांनी रुग्णांना आवाहन केले. शिबिरात  आलेल्या रुग्णांना ५0 हजारांचे औषधे डॉ. अभय पाटील यांनी  स्वखर्चाने आणले. नेत्र तपासणी झालेल्या २00 रुग्णांना चष्मे  वाटप मारवाडी युवा मंच अकोला यांच्या वतीने मोफत देण्यात  आले. रोगनिदान शिबिरात डॉ. अभय पाटील, डॉ. रेखाताई  पाटील, डॉ. अनंत शेवाळे, डॉ. गौरव शिंदे, डॉ. संदीप चव्हाण,  डॉ. अभिजित नालट, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. किशोर ढोणे,  डॉ. नितीन पाटील, डॉ. राजेश चिंचोळकर आदींनी सेवा दिली.  तसेच डॉ. सचिन ठाकरे यांची रक्तपेढीची चमू उपस्थित होती.