शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

ऑनलाईन नोंदणीनंतरच आता कायमस्वरुपी वाहन चालक परवाना

By admin | Updated: November 30, 2014 22:25 IST

१ डिसेंबरपासून राज्यभर अंमलबजावणी.

वाशिम : वाहन व चालकांच्या सुरक्षिततेसाठी नवनवे उपक्रम अंमलात आणणार्‍या प्रादेशिक परिवहन विभागाने शिकाऊ परवान्यानंतर (लर्निंग लायसन्स) आता वाहन चालविण्याचा कायमस्वरुपी परवाना (परमनन्ट लायसन्स) देण्यापूर्वी ऑनलाईन नावनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.रस्ते अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्याच्यादृष्टिने, चालकांकडून वाहतूक नियमांची उजळणी करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ऑनलाईन चाचणी परीक्षा अगोदरच सुरू केली आहे. ही परीक्षा देण्यासाठी प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उमेदवारांची गर्दी होते. परिणामी, अनेकांना कार्यालयात ताटकळत राहावे लागते. लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकरिता उमेदवारांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च होऊ नये, यासाठी राज्यभरात १ सप्टेंबरपासून ह्यऑनलाईन अपॉईन्टमेंटह्णची सुविधा अंमलात आणण्यात आली. लर्निंग लायसन्ससाठी ह्यऑनलाईन अपॉईन्टमेंटह्णचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, परमनन्ट लायसन्सच्या परीक्षेसाठीही हीच पद्धत लागू करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या विचाराधीन होता. त्यानुसार परमनन्ट लायसन्सच्या परीक्षेसाठीही ऑनलाईन नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. राज्यभरात १ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.ऑनलाईन नावनोंदणीद्वारे परमनन्ट लायसन्ससाठी द्याव्या लागणार्‍या परीक्षेची तारीख व वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना बहाल करण्यात आले आहे. ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनाच परमनन्ट लायसन्सची परीक्षा देता येणार आहे. या प्रक्रियेमुळे नागरिकांना परिवहन कार्यालयात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सकाळी १0 ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १ व दुपारी १ ते २ अशा चार वेळेत परीक्षा देण्याचा पर्याय अर्जदारांना निवडता येणार आहे.*अशी करावी नोंदणी..ह्यडब्लूडब्लूडब्लू.सारथी.एनआयसी.इन या संकेतस्थळावर जावून ह्यइश्यू ऑफ परमनन्ट लायसन्स टू मीह्ण हा पर्याय अर्जदाराने निवडावा. हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनवर उपलब्ध झालेल्या अर्जात संपूर्ण माहिती भरावी. तसेच, उजव्या बाजुला अर्ज क्रमांक (अँप्लिकेशन नंबर) असल्याची खात्री करुन तो लिहून घ्यावा व नंतर त्या क्रमांकाने अर्जातील माहिती भरावी. सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या सोयीची तारीख व वेळ निवडण्याची मुभा अर्जदाराला राहणार आहे.