शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाच्या आरक्षणाची अधिसूचना मिळाली!

By admin | Updated: August 30, 2014 01:37 IST

अकोला महापौर पदाच्या आरक्षणाची अधिसूचना प्राप्त; निवडणुकीचा मार्ग मोकळा.

अकोला : महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत १६ ऑगस्ट रोजी काढण्यात आल्यानंतर निवडणुकीच्या तारखेची अनेकांना उत्सुकता लागली होती. आरक्षणाची अधिसूचना मनपाला प्राप्त झाली असून, यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. याकरिता विभागीय आयुक्तांची परवानगी घेण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या महापौरपदाचा अडीच वर्षांंचा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. त्या पृष्ठभूमीवर मुंबईत आगामी अडीच वर्षांंच्या कालावधीसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत १६ ऑगस्ट रोजी काढण्यात आली असता, अकोला मनपासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाले. मार्च २0१२ मध्ये महापौरपदाकरिता अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील महिला उमेदवाराचे आरक्षण निघाले होते. त्यावेळी महापौरपदाची संधी भारिप-बहुजन महासंघाच्या ज्योत्स्ना गवई यांच्याकडे चालून आली. तूर्तास महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाल्यामुळे या पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुक महिला नगरसेविकांनी जोरदार तयारी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यास महापौरपदाची निवडणूक लांबण्याची अनेकांना धास्ती होती. मात्र आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्यावरदेखील महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेता येतो. नुकतीच आरक्षणाची अधिसूचना मनपाला प्राप्त झाली आहे. तारीख निश्‍चित करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त अमरावती, यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्या जाईल. त्यावर विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतल्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल. *येत्या आठवड्यात महापौरपदाची निवडणूकमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इच्छुकांनी आपापल्या पक्षातील वरिष्ठांकडे ह्यफिल्डिंगह्ण लावली असून, नगरसेवकांनादेखील आश्‍वस्त केले जात आहे. प्रशासनाकडूनसुद्धा निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब होणार नसल्याने येत्या आठवड्यात महापौरपदाचा दावेदार निवडल्या जाण्याची दाट शक्यता आहे.