शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोटीस तयार; मोबाइल कंपन्यांना द्यावे लागतील ३४ कोटी रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:17 IST

मोबाइल कंपन्यांकडून सुमारे ३४ कोटी रुपये शुल्क वसूल करण्यासाठी प्रशासनाने नोटीस तयार केली आहे.

अकोला : महापालिकेच्या परवानगीला ठेंगा दाखवत शहरात तब्बल ६० ते ६६ किलो मीटर अंतराचे अनधिकृत भूमिगत केबलचे जाळे टाकणाऱ्या विविध मोबाइल कंपन्यांकडून सुमारे ३४ कोटी रुपये शुल्क वसूल करण्यासाठी प्रशासनाने नोटीस तयार केली आहे. शहरातील एका ज्येष्ठ विधिज्ञामार्फत थेट कंपन्यांच्या विधी विभागाला नोटीस जारी केली जाणार असल्याची माहिती आहे.शहरात भूमिगत फायबर आॅप्टिक केबल टाकण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी महापालिका प्रशासनाची परवानगी घेणे क्रमप्राप्त होते. तसे न करता रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मनपाच्या परवानगीला धाब्यावर बसवित शहराच्या विविध भागात खोदकाम करून केबल व ‘डक’चे जाळे निर्माण केले. मोबाइल कंपनीकडून नियमबाह्यरीत्या फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर प्रशासनाला झोपेतून जाग आली. या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत रिलायन्स, आयडिया, व्होडाफोन, स्टरलाइट आदी कंपन्यांच्या विरोधात मनपाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. यादरम्यान, संबंधित मोबाइल कंपनीच्या प्रतिनिधींसोबत मनपा प्रशासनाची चार वेळा बैठका पार पडल्यानंतरही कंपन्यांनी प्रशासनाकडे शुल्क जमा केले नाही.रिलायन्स कंपनीने मनपाच्या तपासणीत आढळून आलेल्या केबलवर आक्षेप घेत संयुक्त तपासणीची मागणी केली असता, प्रशासनाने मान्य करीत २२ जूनपासून तपासणीला प्रारंभ केला. यादरम्यान, प्रशासनाकडून विधिज्ञामार्फत नोटीस देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.

...तर कंपन्यांचे संचालक अडचणीत येणारमनपाने फोर-जी प्रकरणी विधिज्ञामार्फत नोटीस जारी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे थेट कंपन्यांचे राज्यस्तरीय संचालक अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे मोबाइल टॉवरची सेवा खंडित करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केल्याची माहिती आहे.

३४ कोटींचा भरणा करावाच लागेल!मनपाच्या परवानगीशिवाय रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने शहरात टाकलेल्या अनधिकृत भूमिगत केबल व ‘डक’ प्रकरणी कंपनीला सुमारे ३० कोटींचे शुल्क आकारण्यात आल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त शहरात उभारलेल्या अनधिकृत टॉवरप्रकरणी विविध मोबाइल कंपन्यांना मालमत्ता कर वसुली विभागाने दोन टक्के शास्तीची आकारणी करीत ४ कोटींचा दंड आकारला असून, कंपन्यांना ३४ कोटींचा भरणा करावाच लागणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका