शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची थेट खरेदी करणाऱ्या राज्यातील बाजार समितीच्या परवानाधारकांना नोटीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:46 IST

 अकोला : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीनची थेट खरेदी करणाऱ्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परवानाधारकांना महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांचे सोयाबीन व्यवहाराचे विवरण परवानाधारकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेकडे २४ आॅगस्टच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

- संजय खांडेकर

 अकोला : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान सोयाबीनची थेट खरेदी करणाऱ्या महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परवानाधारकांना महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उपरोक्त तीन महिन्यांचे सोयाबीन व्यवहाराचे विवरण परवानाधारकांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेकडे २४ आॅगस्टच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जर हे विवरण सादर करण्यात आले नाही, तर परवानाधारकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य पणन संचालकांनी दिला आहे.आॅक्टोबर १६ ते डिसेंबर १६ या कालावधीत सोयाबीनची विक्री केलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनुदान योजनेचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परिपत्रकानुसार अटी व शर्तीचे अधीन राहून सोयाबीन अनुदान योजनेत समावेश करण्यास मान्यता मिळाली आहे. आता तत्कालीन सोयाबीन खरेदी-विक्रीचे विवरण तपासले जात आहे. यासाठी राज्यभरातील खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (अ) परवानाधारक आणि थेट पणनमधील (ब) परवानाधारकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. परवानाधारकांनी २४ आॅगस्टपर्यंत या व्यवहाराचे विवरण सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांकडे सादर करावे. उपरोक्त माहिती सादर न केल्यास महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनिमय) नियम १९६३ अंतर्गत नियम १९६७ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालनालयाचे संचालक यांनी नोटीसद्वारे दिला आहे. सोबतच मुंबई, वर्धा, नागपूर, परभणी, यवतमाळ, लातूर, चंद्रपूर, सोलापूर, धुळे, अकोला येथील जिल्हा उपनिबंधकांना यासंदर्भात कारवाई करण्याचा आदेशही महाराष्ट्र राज्य पुणे पणन संचालकांनी बजावला आहे.सोयाबीन खरेदी-विक्री व्यवहारप्रकरणी सर्व विवरणपत्र आणि दस्तऐवज हे कृषी उत्पन्न बाजार समितीकडेच आहेत. त्यामुळे ही माहीती बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे सोपवावी.- प्रकाश ढोमणे, परवानाधारक, कृउबास, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती