शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयातील चार विधिज्ञांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 12:33 IST

अकोला: अकोला न्यायालयातील पहिल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह तसेच अवमानकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी अकोला जिल्हा न्यायालयातील चार विधिज्ञांना अवमानना नोटीस बजावण्यात आली.

अकोला: अकोलान्यायालयातील पहिल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह तसेच अवमानकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी अकोला जिल्हा न्यायालयातील चार विधिज्ञांना अवमानना नोटीस बजावण्यात आली असून, यासंदर्भात सदर विधिज्ञांना न्यायालयासमोर उत्तरही द्यावे लागल्याची माहिती आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी २७ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.न्यायालयीन कामकाजाला अनुसरून न्यायाधीशांच्या बाबतीत वकिलांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरून एका जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा अवमान होईल, अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाला होता. ही बाब न्यायाधीशांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये चार वकिलांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. हेतुपुरस्सर या पोस्ट करण्यात आल्याच्या निर्णयापर्यंत न्यायालय पोहोचले. त्यानंतर अखेर न्यायाधीशांनी ठोस भूमिका घेत या चारही विधिज्ञांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान केल्याचा संदर्भ दिला व वकिलांनी केलेली कृती हे न्याय व्यवस्थेचा अवमान करणारी असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणााची दखल घेत उच्च न्यायालयाने संबंधित चारही वकिलांना नोटीस दिलेल्या असून, त्यानुसार ११ मार्च रोजी उच्च न्यायालयात या चार वकिलांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. तारखेनुसार चारही वकील उपस्थित झाले होते. एका महिला न्यायाधीशांविरुद्ध अशा प्रकारचा अवमानजनक उल्लेख केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर २७ मार्च रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. याप्रकरणी न्यायाधीश आणि वकिलांमध्ये समेट घडवून आणण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले होते; मात्र त्यानंतरही याबाबत योग्य तोडगा न निघाल्याने प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असून, न्यायालयातील या प्रकरणावर आता उच्च न्यायालय काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय