शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

२१ ग्रामपंचायतींना दिली नोटिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:47 IST

अकोला: अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ््याच्या दिवसात जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देदूषित पाणीपुरवठा: जलजन्य साथरोगाच्या काळातही २१ ग्रामपंचायतींचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ््याच्या दिवसात जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींना बजावलेल्या नोटिसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिला आहे.जिल्हास्तरीय पथक तसेच आरोग्य कर्मचाºयांनी जूनमध्ये गावांतील पाणीपुरवठा योजना, स्रोतांतून नमुने गोळा केले. त्याची तपासणी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली. पाणी नमुने तसेच ब्लिचिंग पावडरचीही तपासणी झाली. त्या तपासणीमध्ये ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता कमालीची घसरलेली आढळली. त्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच २१ पेक्षाही अधिक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली. पावसाळ््याच्या दिवसात ग्रामस्थांना ब्लिचिंग पावडरने निर्जंतुक केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे; मात्र या महत्त्वाच्या बाबींकडेच ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळेच सध्या पावसाळ््याच्या दिवसात जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचेही पुढे आले आहे. अकोला, अकोट, बाळापूर तालुक्यातील गावांमध्ये ही संख्या मोठी आहे. त्याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी घेतली आहे.जलजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढतीन तालुक्यातील गावांमध्ये सातत्याने जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, हगवण, अतिसार, विषमज्वर या आजारांच्या रोग्यांचा समावेश आहे. या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत.सहा महिन्यांपासून अशुद्ध पाणीपुरवठासाथरोग मासिक अहवालानुसार जिल्ह्यातील २१ गावांमध्ये सहा महिन्यांपासून ब्लिचिंग पावडरच नसल्याचे नमूद आहे. अकोला तालुक्यातील अलियाबाद, चाचोंडी, सिसा, बोंदरखेड, शिवणी, मलकापूर, शिवर, सोमठाणा, दुधाळा, मंडाळा, अमानतपूर ताकोडा, बादलापूर, बाळापूर तालुक्यातील सोनगिरी, दगडखेड, स्वरूपखेड, शिंगोली, सोनाळा, चिंचोली, धाडी बल्हाडी या गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही गावे खारपाणपट्ट्यातील आहेत. याप्रकरणी दोन्ही गटविकास अधिकाºयांनाही २० जुलै रोजी नोटिस बजावण्यात आली आहे.ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण राखागावात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडरचा वापर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाणही आवश्यकतेएवढे राखण्याचेही बजावले आहे.पावसाळ््याच्या दिवसात जलजन्य आजारांपासून ग्रामस्थांचे रक्षण व्हावे, यासाठी ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. गावात शुद्ध पाणीपुरवठा झाल्यास या रोगांना प्रतिबंध होतो.- डॉ. हरी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.