शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी नव्हे, तर संघच चालवितो देश- खरगे यांचा आरोप  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 14:02 IST

अकोला: केंद्र सरकारचे नेतृत्व जरी मोदींच्या हाती असले, तरी प्रत्यक्षात राष्टÑीय स्वयंसेवक संघच हा देश चालवित असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

अकोला: केंद्र सरकारचे नेतृत्व जरी मोदींच्या हाती असले, तरी प्रत्यक्षात राष्टÑीय स्वयंसेवक संघच हा देश चालवित असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. अकोट येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, की संघाने आपला अजेंडा राबविण्यासाठी भाजपाच्या सत्तेचा पूर्णपणे वापर केला आहे. ही मंडळी संविधानविरोधी आहेत, त्यामुळे भाजपाला होणारे मतदान हे संविधान विरोधातील मतदान ठरणार असल्याचेही ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रात मल्लिकार्जुन खरगे यांची पहिली प्रचारसभा अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ७ एप्रिल रोजी पार पडली. यावेळी त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. भाजपा ही सत्तेसाठी निर्माण झालेली पार्टी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोदींना वेळ नाही. मोदी संसदेत बोलत नाहीत, फक्त विदेशात बोलतात. गेल्या पाच वर्षांत ते संसदेमध्ये के वळ २५ तास २५ मिनिटे बोलले आहेत. हा देश ते चालवितच नाहीत तर संघ चालवितो, असा घणाघात त्यांनी केला. मोदी संसदेमध्ये म्हणतात, काँग्रेसने देशाला बरबाद केले; परंतु काँग्रेसने देशाला बरबाद केले असते तर मोदी संसदेमध्ये पंतप्रधान म्हणून खुर्चीवर बसू शकले नसते. मोदी खुर्चीवर बसले ते संविधान आणि लोकशाहीमुळे हे मोदी विसरत असून, संविधान बदलविण्याची भाषा करीत असल्याचा आरोपही खरगे यांनी केला. संविधानाच्या रक्षणाकरिता काँग्रेस निवडणूक रिंगणात आहे. तेव्हा ही निवडणूक एका समाजाची किंवा एका व्यक्तीची निवडणूक नाही, तर विचारधारेची निवडणूक आहे, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी अकोला लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल, काँग्रेसचे, राष्ट्रीय सचिव आशिष दुवा, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, अनंतराव देशमुख, रामदास बोडखे, प्रा. मुकुंद खैरे यांच्यासह आघाडीचे सर्व जिल्ह्याचे नेते तसेच माजी आमदार उपस्थित होते. संचालन प्राध्यापक संजय घोडके यांनी केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाakotअकोटLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक