शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नॉन क्रिमीलेअर दाखला तीन वर्षांसाठी मिळणार

By admin | Updated: July 6, 2014 23:28 IST

नॉन क्रिमीलेअर दाखला एकऐवजी तीन वर्षांसाठी मिळणार आहे.

बुलडाणा : इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (ओबीसी) प्रवेशासाठी आवश्यक असलेला नॉन क्रिमीलेअर दाखला एकऐवजी तीन वर्षांसाठी मिळणार आहे. त्यामुळे दरवर्षी हा दाखला काढण्याची हजारो विद्यार्थ्यांची कटकट आता दूर होणार असून प्रवेशाच्या काळात दाखले देणार्‍या यंत्नणेवरील ताणही निम्म्याने कमी होणार आहे. ओबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांंला आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यासाठी नॉन क्रिमीलेअर दाखला अत्यावश्यक ठरविण्यात आला आहे. त्यासाठी सहा लाख रूपयांची वार्षिक उत्पन्नाची र्मयादा आहे.या दाखल्याशिवाय प्रवेश मिळत नसल्याने प्रवेशाच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या नागरी सुविधा केंद्रात दाखला मिळविण्यासाठी विद्यार्थी पालकांची झुंबड उडते. अनेकदा वेळेत दाखले मिळाल्यास या विद्यार्थ्यांना खुल्या गटात प्रवेश घ्यावा लागतो. किंवा प्रवेशाची संधी हुकते. सध्या या दाखल्याची मुदत एक वर्षाची आहे. त्यामुळे पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी पुन्हा दाखला मिळविण्यासाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येते. आता मात्न हा दाखला तीन वर्षांसाठी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यंदा मिळालेला दाखला पुढील तीन वर्ष वैध ठरणार असल्याने पुढील दोन वर्षे हा दाखला मिळविण्याची विद्यार्थी पालकांची कटकट वाचणार आहे. शालांत परीक्षा आटोपल्यानंतर प्रवेशाच्या कालावधीत या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढते. विविध दाखल्यांच्या मागणीपैकी सुमारे ६0 टक्के अर्ज हे नॉन क्रिमीलेअरचे असतात. मात्न शासनाने नॉन क्रिमीलेअरची र्मयादा ३ वर्षांसाठी केल्यामुळे प्रशासनाचा भार कमी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

** असे असणार निकष

नॉन क्रिमीलेअर दाखला देण्यासाठी संबंधित कुटुंबांचे गेल्या तीन वर्षांचे उत्पन्न गृहीत धरण्यात येते. आता नव्या पद्धतीनुसार गेल्या तीन वर्षांच्या उत्पन्नामध्ये एका वर्षाचे उत्पन्न नॉन क्रिमीलेअरच्या र्मयादेत असेल तर त्याला एका वर्षाचा, दोन वर्षांचा आणि तीन वर्षांचे उत्पन्न र्मयादेत असेल तर तीन वर्षांचा दाखला दिला जाणार आहे. त्यावर हा दाखला तीन वर्षांपर्यंत वैध आहे, असे स्पष्टपणे नमूद करण्यात येणार आहे.