शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अपारंपरिक ऊर्जा योजनेस आयोगाने फासला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 14:05 IST

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नव्या प्रस्तावानुसार नेट मीटरिंग फक्त घरगुती ग्राहकांना लागू राहणार आहे.

अकोला : केंद्र सरकारने अपारंपरिक ऊर्जा निर्मितीस चालना देणारे नियम केले असून, त्यासाठी समाजातील युवकांना प्रेरणा देऊन पुढे आणले जात आहे. मात्र महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने तयार केलेल्या नव्या प्रस्तावामुळे सौर ऊर्जा वीज निर्मिती निर्बंध लादला गेला आहे. यातून वीज निर्मिती होणे तर दूर युवकांच्या हातातील आहे तो रोजगारही बंद पडणार असल्याने रोष व्यक्त होत आहे.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नव्या प्रस्तावानुसार नेट मीटरिंग फक्त घरगुती ग्राहकांना लागू राहणार आहे. त्यातही पहिले ३०० युनिट जे सौर ऊर्जा प्रणालीतून तयार झाले असतील, ते वजा करण्यात येतील. उर्वरित युनिट फक्त ३.६४ या दराने महावितरण खरेदी करेल. याउलट ग्राहकाला विद्युत्त बिल देताना ८ रुपयांपेक्षा जास्त दराने आकारणी होईल. व्यावसायिक ग्राहकांना तर ३.६४ रुपयांनी वीज विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे.सौर ऊर्जा प्रणालीत सद्यस्थितीत करावी लागणारी गुंतवणूक लक्षात घेता ३.६४ रुपये हा दर व्यावहारिक ठरत नाही. परिणामी, गत काही वर्षांमध्ये सौर ऊर्जेच्या वापराकडे वळत असलेले ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे. आयोगाच्या धोरणामुळे स्वयंरोजगारासाठी निघालेल्या युवकांना जबर आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यानुषंगाने नुकतीच अकोल्यात सौर ऊर्जा उपकरण विक्रेते व ग्राहकांची बैठक पार पडली. त्यात वीज ग्राहकांवर होणारे परिणाम व आर्थिक मंदीत आयोगाने ओढवून घेतलेल्या संकटावर मंथन झाले. याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष मोहनराव गंगाखेडकर, मंजित देशमुख, हेमंत जकाते, प्रदीप मालानी, योगेश बियाणी, श्रीवल्लभ पुसेगावकर, श्रीकांत पिंजरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. लवकरच आंदोलन छेडण्याचा विचार येथे समोर आला.

टॅग्स :Akolaअकोला