शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी नाकारल्याने महापौरांचा प्रभाग प्रतिष्ठेचा

By admin | Updated: February 11, 2017 02:30 IST

प्रभाग ६ : तीन नगरसेवक आणि माजी महापौर रिंगणात

अकोला, दि. १0- भाजपाच्या महापौर उज्‍जवला देशमुख यांना उमेदवारी नाकारून पक्षश्रेष्ठींनी रामदासपेठेतील सारिका जयस्वाल यांना उमेदवारी दिल्याने महापालिका प्रभाग क्रमांक ६ भाजपा नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. तीन नगरसेवक, विविध पक्ष, संघटनेचे चार पदाधिकारी आणि माजी महापौर सुरेश पाटील या प्रभागातून निवडणूक रिंगणात आहेत. तर येथील तीन प्रवर्गात भारिप-बहुजन महासंघाने कुणालाही उमेदवारी दिलेली नाही.देशमुख फैल, मनकर्णा प्लॉट, स्कायलार्क हॉटेल, रामदासपेठ परिसर असलेल्या या प्रभागात मराठा, व्यापारी आणि भाजपा विचारांचा प्रभाव आहे. अनुसूचित महिलांसाठी राखीव असलेल्या ह्यअह्ण प्रवर्गात काँग्रेस, भाजप, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आणि दोन अपक्ष असे ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भारिप बहुजन महासंघाने येथून उमेदवार दिलेला नाही. इतर मागासवर्गीय पुरुषांसाठी राखीव असलेल्या ह्यबह्ण प्रवर्गात शिवसेनेकडून तरुण बगेरे, भाजपकडून राहुल देशमुख, राष्ट्रवादीकडून देवानंद ताले, काँग्रेसकडून माजी महापौर सुरेश पाटील हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या ह्यकह्ण प्रवर्गातून भाजपच्या महापौर उज्‍जवला देशमुख यांना उमेदवारी नाकारली गेली. त्याऐवजी रामदासपेठेतील सारिका टोलू जयस्वाल यांना भाजपने उमेदवारी दिली. दरम्यान, भाजपातूनच दुखावलेले मयूर विखे यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर येथून निवडणूक रिंगणात आहेत. महिला काँग्रेसच्या पदाधिकारी जयश्री भुईभार यासुद्धा लढतीमध्ये असून येथे अपक्ष उमेदवार नाही. ह्यडह्ण प्रवर्गात भाजप नगरसेवक राजेंद्र गिरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पवन महल्ले यांच्यासह काँग्रेस, सेना आणि भारिपने उमेदवार टाकले आहेत. एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यापैकी तीन अपक्ष आहेत. कधी काळचे सुरेश पाटील यांचे कट्टर सर्मथक असलेले महल्ले भाजपच्या उमेदवाराशी लढत देणार आहेत.