शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा पत्ता नाही, तरीही देयक वाटपाचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 15:09 IST

पाणीपट्टीधारकांना मीटर रिडिंग न घेताच देयक वाटप करण्याचे काम जलप्रदाय विभागाने कंत्राट दिलेल्या एजन्सीने सुरू केले आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी शिवसेनेने मंगळवारी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देहरातील मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ५४ हजार असली, तरी त्यापैकी सुमारे १५ ते २० हजार मालमत्ताधारकांकडे अधिकृत नळ कनेक्शन व मीटर लावले आहेत. नळाला मीटर लावल्यास दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मीटर रिडिंग न घेताच संबंधित मालमत्ताधारकांना देयक अदा करण्याचा अफलातून प्रकार होत आहे.

अकोला : शहरवासीयांना दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगत मनपा प्रशासनाने नळाला मीटर लावण्याची मोहीम मोठ्या धडाक्यात सुरू केली. थातूर-मातूरपणे ठरावीक भागात नळाला मीटर लावल्यानंतर दैनंदिन पाणी पुरवठा तर सोडाच, आता आठव्या दिवशीसुद्धा पाणी पुरवठा होत नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत ज्या नळाला मीटर लावण्याची घिसाडघाई करण्यात आली, त्या पाणीपट्टीधारकांना मीटर रिडिंग न घेताच देयक वाटप करण्याचे काम जलप्रदाय विभागाने कंत्राट दिलेल्या एजन्सीने सुरू केले आहे. हा प्रकार तातडीने थांबवण्याची मागणी शिवसेनेने मंगळवारी मनपा आयुक्तांकडे केली आहे.महापालिकेची हद्दवाढ होण्यापूर्वी शहरातील ७२ हजार मालमत्ताधारकांपैकी ३६ हजार मालमत्ताधारकांकडे नळाचे कनेक्शन असल्याची नोंद होती. यापैकी बोटावर मोजता येणारे पाणीपट्टीधारक मनपाकडे पाणीपट्टी कर जमा करीत होते. अर्थातच, शहरातील लोकसंख्येची आकडेमोड लक्षात घेतल्यास इतर सर्व मालमत्ताधारक मनपाच्या पाण्याचा फुकटात वापर करीत असल्याचे चित्र होते. अधिकृत नळ कनेक्शनधारकांची संख्या निश्चित नसल्याने शहराला दैनंदिन किती लाख लीटर पाणी पुरवठा होतो, याचा काहीही ताळमेळ नव्हता. ही बाब ध्यानात घेता प्रशासनाने नळाला मीटर लावण्याची मोहीम सुरू केली. हद्दवाढ होण्यापूर्वी ठरावीक प्रभागात नळाला मीटर लावण्याची मोहीम राबवून जलप्रदाय विभागाने हात वर केले. सद्यस्थितीत शहरातील मालमत्ताधारकांची संख्या १ लाख ५४ हजार असली, तरी त्यापैकी सुमारे १५ ते २० हजार मालमत्ताधारकांकडे अधिकृत नळ कनेक्शन व मीटर लावले आहेत. नळाला मीटर लावल्यास दररोज पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी दिले होते. सदरचे आश्वासन हवेत विरले असून, मीटर रिडिंग न घेताच संबंधित मालमत्ताधारकांना देयक अदा करण्याचा अफलातून प्रकार होत आहे. यावर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह सेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत यासंदर्भात मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना निवेदन सादर केले. यावेळी सेनेचे नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशीकांत चोपडे, योगेश गीते आदी उपस्थित होते. मोहीम का थांबवली?शहराच्या विशिष्ट भागात नळाला मीटर लावल्यानंतर प्रशासनाने ही मोहीम थांबवल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इतर भागात ही मोहीम न राबवण्याचे काय कारण, असा सवाल शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. ज्या भागात मीटर लावले नसतील, त्या भागातील नागरिकांना अतिरिक्त दंड न आकारता जुन्या दरानेच पाणीपट्टी वसूल करण्याची मागणी त्यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका