शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंगची तक्रार नाही!

By admin | Updated: February 11, 2017 02:25 IST

अकोला महापालिकेच्या ‘कॉप’ अँपकडे कानाडोळा.

अकोला, दि. १0- महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करणार्‍यांविरोधात घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी प्रशासनाने 'कॉप' मोबाइल अँप तयार केले. तक्रारकर्त्यांंची नावे गोपनीय ठेवण्याची यामध्ये तरतूद असताना आजपर्यंंत मनपाकडे एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याने सदर अँपकडे अकोलेकरांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. महापालिक निवडणुकीसाठी रिंगणात उभे असणार्‍या उमेदवारांची प्रचार यंत्रणा जोराने कामाला लागली आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, गरजू मतदारांना काय हवे काय नको, याची विचारपूस केली जात आहे. अर्थातच, निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर सोपविण्यात आली असून उमेदवारांच्या प्रभागात आचारसंहितेचे पालन होते किंवा नाही, हे पाहण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी पथके तैनात केली आहेत. यामध्ये मनपा अधिकारी, कर्मचार्‍यांसह इतर शासकीय विभागातील अधिकार्‍यांचा समावेश आहे. महापालिकेत आचारसंहितेचा भंग झाल्यास तक्रार कक्षाचे गठन करण्यात आले असून या ठिकाणी अधिकारी-कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आचारसंहितेचा भंग करणार्‍या उमेदवारांच्या विरोधात मतदारांना घरबसल्या तक्रारी करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाइलद्वारे 'कॉप' अँप तयार करण्यात आले. सदर अँपवर अद्यापपर्यंंत मनपाकडे एकही तक्रार प्राप्त नसल्यामुळे अकोलेकरांनी अँपकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रशासकीय यंत्रणा हवी सतर्कमहापालिका प्रशासनाने स्थानिक अधिकारी, कर्मचार्‍यांची झोननिहाय पाच पथके गठित केली. पथकातील सर्वच अधिकारी-कर्मचारी स्थानिक असल्यामुळे निवडणुकीच्या चर्चा, उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोयीचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींवर विसंबून न राहता मनपाची प्रशासकीय यंत्रणा सतर्क असणे अपेक्षित आहे.