शहरं
Join us  
Trending Stories
1
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
4
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
5
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
6
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
7
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
8
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
9
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
10
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
11
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
12
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
13
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
14
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
15
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
16
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
17
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
18
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
19
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
20
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल

महिला व बालकल्याणच्या योजनांचा लाभ नाहीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:52 PM

भाजपची २०१४ पासून मनपात सत्ता असली तरी आजपर्यंत पात्र महिला व शाळकरी मुलींना योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे.

अकोला: महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतींचा कार्यकाळ १४ एप्रिल रोजी संपुष्टात आला आहे. भाजपची २०१४ पासून मनपात सत्ता असली तरी आजपर्यंत पात्र महिला व शाळकरी मुलींना योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. २१ जून रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची निवड केली जाणार असून, याकरिता सत्तापक्षाची लगबग सुरू झाली आहे. गोरगरीब लाभार्थींना योजनांचा लाभ दिला जात नसेल, तर अशा विविध समित्या व त्यावरील पदाधिकाºयांचा उपयोग कशासाठी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका जयस्वाल यांचा १४ एप्रिल रोजी सभापती पदाचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे या समितीच्या सभापती पदासाठी मनपाच्या सर्वसाधारण सभेत निवड केली जाईल. या विभागामार्फत गरजू महिलांना शिलाई मशीन व मनपाच्या शाळकरी मुलींना सायकल वाटप करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाते. मनपात सप्टेंबर २०१४ पासून भाजपची सत्ता आहे. या विभागासाठी मागील पाच वर्षांच्या कालावधीत दरवर्षी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर महिला व बालकल्याण विभागातील योजनांचा पात्र व गरजू लाभार्थींना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तसे न होता, अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या निधीचा लाभ देण्यात सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले. दरम्यान, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासह झोन समिती सभापतींचा कार्यकाळदेखील संपुष्टात आला आहे.समिती पदाधिकाऱ्यांसाठी की अकोलेकरांसाठी?मनपाच्या महिला व बालकल्याण समितीसह झोन समित्या पदाधिकाºयांच्या वैयक्तिक फायद्यासाठी की सर्वसामान्य अकोलेकरांच्या सोयी-सुविधेसाठी यावर चर्चेच्या फैरी झडत आहेत. मागील पाच वर्षांपासून महिला व बालकल्याण विभागामार्फत पात्र महिलांना शिलाई मशीन व मनपाच्या शाळकरी मुलींना सायकल वाटप झाले नसल्यामुळे हेच का ‘अच्छे दिन’, असा सवाल सर्वसामान्य अकोलेकर उपस्थित करू लागले आहेत.

निधीचा वापर नाही; भाजपचे अपयश२०१३-१४- १ कोटी रुपये२०१४-१५- २ कोटी२०१५-१६- १ कोटी२०१६-१७- १ कोटी ३० लाख२०१७-१८- १ कोटी ५० लाख२०१८-१९- २ कोटी ३६ लाख२०१९-२०- ३ कोटी २५ लाख

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका