शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

पदांना मंजुरी नाही, अन् सुपर स्पेशालिटीच्या उद्घाटनाची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 13:07 IST

अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मार्च २०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

ठळक मुद्देऔरंगाबाद, अकोला आणि लातूर येथील हॉस्पिटलच्या इमारतीचे निर्माण कार्य ९५ टक्के पूर्ण झाले.चारही हॉस्पिटलच्या पद मंजुरीचा आराखडा संचालकांकडे पाठविण्यात आला.परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यात अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे निर्माण कार्य सुरू आहे; पण चारही रुग्णालयांच्या आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाची घाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अकोल्यासह औरंगाबाद व लातूर येथील सुपर स्पेशालिटीचे डिसेंबरमध्येच, तर यवतमाळच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मार्च २०२० मध्ये करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यातील चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली. चारही इमारतींचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नाही. चारही हॉस्पिटलच्या पद मंजुरीचा आराखडा संचालकांकडे पाठविण्यात आला. त्यांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्यासाठी मनुष्यबळ नसताना केंद्र सरकारकडून होत असलेल्या उद्घाटनाच्या घाईमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची चिंता वाढविली आहे. यासंदर्भात एका उच्चपदीय वैद्यकीय अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली.

अशी आहे सुपर स्पेशालिटीची स्थिती...राज्यात एकाच वेळेस चारही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता मिळाली असून, त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. यातील औरंगाबाद, अकोला आणि लातूर येथील हॉस्पिटलच्या इमारतीचे निर्माण कार्य ९५ टक्के पूर्ण झाले असून, महत्त्वाची वैद्यकीय उपकरणेही येत आहेत; मात्र यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटीचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे.

अकोल्यात पॅरामेडिकलचे चार विभाग रद्दअकोला येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पॅरामेडिकलचे चार विभाग रद्द करण्यात आले आहे. यामध्ये पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, सूक्ष्म जीवशास्त्र व अ‍ॅन्टोमॉलॉजी यांचा समावेश असून, त्याचा संपूर्ण भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर पडणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय