शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

विभागात अकोला जिल्हा दहावीच्या निकालात नंबर १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST

नववीचा अंतिम निकाल, दहावीतील वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि अंतिम तोंडी प्रात्यक्षिक या आधारे शाळांनी बोर्डाकडे गुण पाठविले होते. ...

नववीचा अंतिम निकाल, दहावीतील वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि अंतिम तोंडी प्रात्यक्षिक या आधारे शाळांनी बोर्डाकडे गुण पाठविले होते. त्यानुसार दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालाविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी उत्सुकता होती. कोरोनामुळे प्रथमच विद्यार्थ्यांना परीक्षेविना दहावी उत्तीर्ण करावी लागली. त्यामुळे दहावीचा निकाल कसा लागेल, किती गुण मिळतील, याविषयी पालकांच्या मनात संभ्रम होता. परंतु, निकाल लागल्यानंतर तो संभ्रम दूर झाला. जिल्ह्याचा निकाल ९९.९९ टक्के लागल्यामुळे जिल्ह्यातील शाळांनी समाधान व्यक्त केले.

पाच तालुक्यांचा निकाल शंभर टक्के!

जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यांचा समावेश आहे. अकोला तालुक्याचा निकाल ९९.९९ टक्के, तर बार्शीटाकळी तालुक्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. एकंदरीत निकालावरून यंदा ग्रामीण भागातील शाळांचा निकाल दर्जेदार लागल्याचे दिसून येत आहे.

असा लागला निकाल

राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना नऊ जुलैपर्यंत मुदत दिली होती. शाळांनी संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण व मूल्यमापनाचे गुण विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविले. मंडळाने शाळांकडून आलेले गुण एकत्रित करून अंतिम निकाल तयार केला.

संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे शाळांची नाराजी

राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या संकेतस्थळांवर जिल्ह्यातील दहावी असलेल्या ३४४ शाळांनी ऑनलाईन निकाल पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुपारचे तीन वाजल्यानंतरही शाळा आणि विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. एकाचवेळी शाळा आणि विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर भेट दिल्यामुळे साईट क्रॅश झाली. मंडळाने एकच साईट दिल्याने, त्यावर ताण आला. त्यामुळे शाळांसह विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. त्यामुळे शाळांनी नाराजी व्यक्त केली.

कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन, लेखी परीक्षांचे गुण शाळांमार्फत पाठविण्यात आले. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांचा निकाल काय लागणारे हे आधीच माहिती होती. त्यामुळे निकालाविषयीची जी पूर्वीची उत्सुकता होती ती यंदा राहिली नाही. तो उत्साहसुद्धा यंदा राहिला नाही.

- संगीता जळमकर, मुख्याध्यापिका, बालशिवाजी माध्यमिक शाळा

दहावीची परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण शाळांच्याच हाती होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा निकालाविषयी उत्सुकता नव्हती. कोणता विद्यार्थी टॉपर राहणार, शाळेचा निकाल काय लागणार याची कल्पना होती. यंदा कोरोनामुळे हिरमोड झाला. निकालाविषयी विद्यार्थी, शिक्षकांमध्येही उत्साह नव्हता.

- प्रा. प्रकाश डवले, प्राचार्य डवले पब्लिक स्कूल