शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
3
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
4
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
5
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
6
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
7
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
8
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
9
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
10
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
11
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

दोन हजारावर विद्यार्थ्यांनी दिली एनएमएमएस परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:26 IST

परीक्षेला जिल्ह्यातून २ हजार ५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

अकोला : इयत्ता आठवीच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी एनसीईआरटी नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) घेतल्या जाते. यंदाची परीक्षा आठ केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेला जिल्ह्यातून २ हजार ५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.शहरातील भारत विद्यालय, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल, शिवाजी विद्यालय मुख्य शाखा, शिवाजी विद्यालय अकोट, जागेश्वर विद्यालय, सेठ बन्सीधर विद्यालय, गाडगे महाराज विद्यालय मूर्तिजापूर, बाबासाहेब धाबेकर विद्यालय बार्शीटाकळी या आठ परीक्षा केंद्रांवर एकूण २,0५१ विद्यार्थी होते. परीक्षेमध्ये पहिला पेपर बौद्धिक क्षमता चाचणी ९0 गुणांचे ९0 बहुपर्यायी प्रश्न, दुसरा पेपर शालेय क्षमता चाचणीमध्ये इ. सातवी व आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामान्य विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, नागरीकशास्त्र, भूगोल असे ९0 गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते. अ.भा. पातळीवर एनएमएमएस शिष्यवृत्तीधारकांची संख्या १ लाख इतकी आहे. राज्यासाठी ११ हजार ६६२ विद्यार्थ्यांचा कोटा आहे. परीक्षेचा निकाल फेब्रुवारी महिन्यात लागणार आहे. शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी इ. नववी ते १२ वी पर्यंत १ हजार रुपये प्रमाण शिष्यवृत्ती दिली जाते.पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी इ. नववी, दहावीमध्ये किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. ही परीक्षा केंद्र प्रमुख मनीषा अभ्यंकर, इम्तियाज अहेमद खान, दिवाकर वानखडे, मीना धुळे, सुनील मसने, राजेंद्र देशमुख, प्रफुल्ल टोपले, गजेंद्र काळे यांनी काम पाहिले. परीक्षा केंद्राला शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, विस्तार शिक्षण अधिकारी अरविंद जाधव, संजय मोरे, विज्ञान पर्यवेक्षक शब्बीर हुसैन, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर, इकबाल भाई यांनी भेटी दिल्या. (प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा