शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपहार प्रकरणात मनपा उपअभियंता निलंबित

By admin | Updated: October 14, 2016 02:08 IST

शिव उद्यानची आवारभिंत बांधलीच नाही; दोन बडतर्फ.

अकोला, दि. १३- प्रभाग क्रमांक ३६ मधील खेतान नगरस्थित शिव उद्यानची आवारभिंत न बांधताच त्याचे ४ लाख ६४ हजार रुपयांचे देयक उकळल्याचा प्रताप महापालिकेचे उपअभियंता जयप्रकाश मनोहर, मानसेवी कनिष्ठ अभियंता घनश्याम उघडे व राजेश श्रीवास्तव यांच्या अंगलट आला. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर गुरुवारी आयुक्त अजय लहाने यांनी उपअभियंता मनोहर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून दोन्ही मानसेवी कर्मचार्‍यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.खेतान नगरस्थित शिव उद्यानची ११0 मीटर लांब अंतराची आवारभिंत बांधण्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाने डिसेंबर २0१२ मध्ये मनपा निधीतून ४ लाख ९0 हजारांची निविदा मंजूर केली. शोएब नामक कंत्राटदाराने आवारभिंत बांधण्याचा कंत्राट घेतला. कंत्राटदाराने पुढील तीन वर्षांंंपर्यंंंत कामाला सुरुवातच केली नाही. त्यामुळे खुद्द बांधकाम विभागानेच १६ मे २0१५ रोजी पत्राद्वारे सदर काम रद्द करीत असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे वृक्षारोपणाच्या रकमेतून शिव उद्यानच्या न बांधलेल्या आवारभिंतीचे ४ लाख ६४ हजारांचे देयकदेखील उकळले. यादरम्यान, महापालिका प्रशासनाने नव्याने शिव उद्यानच्या विकास कामांसाठी नगरोत्थान योजनेतून १0 लाखांची तरतूद केली. या कामासाठी निविदा प्रक्रिया प्रकाशित झाली. या दोन्ही कामासंदर्भात आयुक्तांकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये शिवा मोहोड यांच्या तक्रारीचा समावेश होता. या प्रकरणाची चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला.