शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कचर्‍याच्या व्यवस्थापनासाठी मनपा सरसावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 13:42 IST

नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा एकत्र न करता तो वेगवेगळा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे नागरिकांना आवाहनअकोला: ह्यस्वच्छ महाराष्ट्र अभियानह्णच्या माध्यमातून शहराला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या स्तरावर नानाविध प्रयोग राबवले जात आहेत. १ मे पासून घनकचरा विलगीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, यापुढे नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा एकत्र न करता तो वेगवेगळा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहराच्या कानाकोपर्‍यात प्लास्टिक पिशव्यांचा खच साचला असून, नाले-गटारे तसेच सर्व्हिस लाइनमध्ये घाण-कचरा तुंबला आहे. नागरिकांच्या घरातून निघणारा कचरा जमा करण्यासाठी मनपा प्रशासनाने घंटा गाड्यांची व्यवस्था केली असून, नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर कचर्‍याची साठवणूक केली जाते. घरातून निघणारा कचरा एकत्र करून घंटागाड्यांमध्ये टाकला जातो. त्यामध्ये शिळे अन्न, सडका भाजीपाला, सडकी फळे यांच्यासोबतच प्लास्टिक, काचाचे तुकडे, कापड, रबर,थर्माकॉल आदींचा समावेश राहतो. हा कचरा फेकल्यानंतर तो खाण्यासाठी जनावरांसह कुत्रे, डुकरांची गर्दी होते. जनावरांच्या पोटात प्लास्टिक जात असल्यामुळे त्यांच्यावरही मृत्यू ओढवत असल्याचे चित्र आहे. या सर्व बाबी लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत यापुढे अकोलेकरांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून तो घंटा गाडीमध्ये टाकण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे. दोन डस्टबीन ठेवाव्यात!नागरिकांनी त्यांच्या घरी ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी दोन कचरा पेट्यांची (डस्टबीन)व्यवस्था करण्याची गरज आहे. ओला कचर्‍यात शिजलेले अन्न, शिळे अन्न, सडका भाजीपाला, फळे आदींचा समावेश करावा. तर सुका कचर्‍यात प्लास्टिक पिशव्या, धातू, थर्माकॉल, काचाचे तुकडे, कापड, कातडे, रबर यांचा समावेश करावा. घंटागाडीत व्यवस्था!घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे. डम्पिंग ग्राउंडवर कचर्‍याची साठवणूक केल्यानंतर ओला व सुका कचर्‍यावर प्रक्रिया केली जाईल. त्यानुषंगाने मनपाचे प्रयत्न सुरू आहेत.