शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नववी, दहावीसाठी शिक्षक संच मान्यता

By admin | Updated: June 29, 2017 01:31 IST

पाचवी ते आठवीसाठीही एक पद मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शालेय कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी शाळांना पायाभूत पदांच्या मर्यादेत शिक्षक संच मान्य करण्याबाबत शिक्षण आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, अनुदानित व विनाअनुदानित व इतर सर्व शाळांमधील संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करून इयत्ता नववी, दहावी वर्गामध्ये ४० पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असल्यास किमान शिक्षकांची तीन पदे आणि पाचवी ते आठवी वर्गामध्ये २० पेक्षा अधिक विद्यार्थी पटसंख्या असल्यास शिक्षकाचे एक पद मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१६ व १७ च्या संच मान्यतेमध्ये नववी ते दहावीच्या गटामध्ये तीन शिक्षकांऐवजी दोन, पाचवी ते आठवी वर्गासाठी शून्य शिक्षक मंजूर झाले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षण आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवून गतवर्षीच्या संच मान्यतेमध्ये इयत्ता नववी, दहावीच्या वर्गासाठी शिक्षकांची तीन पदे आणि पाचवी ते आठवी वर्गासाठी एक शिक्षक पद मंजूर करण्याची मागणी केली होती. उशिराने का होईना, प्राथमिक शिक्षक समितीची ही मागणी शिक्षण आयुक्तांनी मान्य केल्याचे पत्र शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहे. संच मान्यतेमध्ये दुरुस्ती करून शिक्षक पदांना मंजुरात देण्यात आली आहे. शाळांमध्ये मूळ वर्ग असल्यास अर्थात आठवी ते दहावीचा वर्ग असल्यास मुख्याध्यापक एक पद, नववी ते दहावीसाठी तीन शिक्षक पदे आणि आठवीसाठी एक पद अशी एकूण शिक्षक संवर्गात पाच पदे तर पाचवी ते दहावी वर्ग असणारी शाळा असल्यास मुख्याध्यापक एक पद, इयत्ता पाचवी ते दहावीसाठी आठ शिक्षक अशी नऊ पदे मंजूर होणे आवश्यक आहेत. एनआयसी स्तरावरून दुरुस्ती केल्यानंतर यापेक्षा कमी किंवा अधिक पदे मंजूर झाली असल्यास त्या शाळांची यादी शिक्षण संचालनालयास तातडीने कळवावी, तोपर्यंत सुधारित संच मान्यता शाळांना वितरित करू नये, असे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.