शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात नीलगाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 01:00 IST

पातूर : पातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील खानापूर बिटमध्ये १ मे रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नीलगायवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

पातूर : पातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील खानापूर बिटमध्ये १ मे रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने एका नीलगायवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.खानापूर परिसरातील मोर्णा रोड येथे रमेश तुळशीराम राऊत यांच्या सर्व्हे नं. ८४/१ या शेतात आलेल्या नीलगायवर सोमवारी उत्तररात्री ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून तिला ठार करून फस्त केले. मोर्णा धरण, खानापूर बिट, आष्टूल, पास्टूल, आगीखेड व खामखेड या परिसरात नेहमीच बिबट्याचा मुक्त संचार असतो. त्यामुळे या परिसरात नेहमीच पाळीव व वन्य प्राण्यांच्या बिबट्याने शिकार केल्याच्या घटना घडतात, तसेच आगीखेड येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याने चार नागरिकांना जखमी केले होते. आता बिबट्याने नीलगायला ठार केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबत पातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला. यावेळी वनरक्षक एस.यू. वाघ, वाय.पी. सरकटे व एम.डी. वाणी हे वनरक्षक उपस्थित होते. नीलगायचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असून, तो पाच वर्षांपेक्षा मोठा आहे. त्याने सदर नीलगायला मारून फस्त केले आहे.- जी.डी. देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी, पातूर.