शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएचएम’ कर्मचाºयांना मिळणार विम्याचे कवच!

By atul.jaiswal | Updated: August 11, 2017 18:22 IST

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचाºयांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी मागविली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने अधिकारी व ...

ठळक मुद्देकर्मचाºयांची वैयक्तिक माहिती मागविली

अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचाºयांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी मागविली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी अत्यंत तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. हे कर्मचारी गत अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. या कंत्राटी कर्मचारी व अधिकाºयांना शासकीय सेवेत नियमित स्वरूपात घेण्याच्या शक्यता पडताळण्यासाठी शासनाने गत महिन्यात आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित केल्याने या कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता या कर्मचाºयांना विमा सुविधा लागू करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. विमा योजनेत कर्मचाºयांचा समावेश करता यावा, यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती विहित नमुन्यात मागविण्यात आली आहे. जिल्हाभरातील कर्मचाºयांची माहिती एकत्रित करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. ही योजना त्वरित राबविण्यात येणार असल्यामुळे कर्मचाºयांची माहिती १४ आॅगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र सर्व संबंधित अधिकाºयांना ८ आॅगस्ट रोजी देण्यात आले आहे. विमा योजनेत सर्वच कर्मचाºयांचा समावेश करण्यात येणार असून, कोणताही कर्मचारी या योजनेपासून वंचित राहू नये, अशा सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.