शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कामांचे नियोजन अडकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 03:12 IST

जुन्या रस्ते कामांच्या ‘वर्क ऑर्डर’; चार कोटींची कामे केव्हा मार्गी लागणार?

संतोष येलकर अकोला, दि. १४- जिल्हय़ात ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) गतवर्षी उपलब्ध निधीतून जुन्या कामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आली; मात्र यावर्षी रस्ते कामांसाठी उपलब्ध चार कोटींच्या निधीतून नवीन रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कारभारात अद्यापही अडकले आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी सन २0१५-१६ या वर्षात जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) सात कोटींचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून ६५ रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले. त्यानुसार या रस्ते कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. १४ ऑक्टोबरपर्यंंंंत २२ रस्ते कामांच्या ह्यवर्क ऑर्डरह्ण जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत देण्यात आल्या. वर्षभरापूर्वी उपलब्ध निधीतून ग्रामीण भागातील रस्ते कामांच्या वर्क ऑर्डर देण्यात येत आहेत; परंतु सन २0१६-१७ या वर्षी जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत गत मार्चअखेर जिल्हा परिषदेला चार कोटींचा निधी उपलब्ध झाला; मात्र सहा महिने उलटून जात असले, तरी उपलब्ध निधीतून जिल्हा परिषदेमार्फत जिल्हय़ातील नवीन रस्ते कामांचे नियोजन अद्याप करण्यात आले नाही. निधी उपलब्ध असताना गत सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कारभारात नवीन रस्ते कामांचे नियोजन अडकले आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सर्वसाधारण सभेची मान्यताही प्रलंबित!जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी ह्यडीपीसीह्णमार्फत चार कोटींचा निधी उपलब्ध झाल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र या निधीतून नवीन रस्ते कामांसाठी नियोजनाच्या विषयाला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणे अद्याप प्रलंबित आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता आणि प्रशासकीय मान्यता केव्हा मिळणार आणि प्रत्यक्षात जिल्हय़ातील रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.सन २0१५-१६ मध्ये उपलब्ध निधीतून मंजूर ६५ रस्ते कामांसाठी ह्यवर्क ऑर्डरह्ण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंंंंत २२ रस्ते कामांच्या ह्यवर्क ऑर्डरह्ण देण्यात आल्या आहेत. सन २0१६-१७ या वर्षात उपलब्ध निधीतील नवीन रस्ते कामांचे नियोजन अद्याप बाकी आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर ही कामे मार्गी लागतील.- अनंत गणोरकरकार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद.