शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात १८ हजारांवर नवीन मतदारांची नोंदणी

By admin | Updated: December 22, 2014 01:11 IST

मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम.

अकोला: जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये जिल्हय़ात १८ हजार ५५५ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनामार्फत गत १ ते १६ डिसेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या पुनरिक्षण कार्यक्रमात १ जानेवारी २0१५ रोजी वयाच्या १८ वर्षावरील नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज क्र.६, मतदार यादीतील मतदारांच्या नावात दुरुस्ती करण्यासाठी नमुना अर्ज क्र.८, तसेच मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना अर्ज क्र.७ मतदान केंद्रांवर स्वीकारण्यात आले. तसेच ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, मात्र फोटो नाही, अशा मतदारांकडून मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांकडून (बीएलओ) पासपोर्ट आकाराचे फोटो जमा करण्यात आले. जिल्ह्यातील आकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, अकोला, मूर्तिजापूर व बाश्रीटाकळी या सातही तालुक्यांमध्ये नमुना अर्ज क्र.६ भरलेल्या १८ हजार ५५५ नवीन मतदारांच्या नावांची नोंदणी मतदार यादीत करण्यात आली. तसेच मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी सातही तालुक्यांमध्ये ७८८ मतदारांचे नमुना क्र. ७ चे अर्ज प्राप्त झाले आणि मतदार यादीतील नावात दुरुस्ती करण्यासाठी २ हजार ५७0 मतदारांकडून नमुना क्र. ८ चे अर्ज प्राप्त झाले.