शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचे काम रखडले!

By admin | Updated: February 5, 2017 02:06 IST

शासनाने मंजुरी दिली; पण महाविद्यालयासाठी अद्याप जागाच नाही; कृषी मंत्री लक्ष देतील का?

राजरत्न सिरसाटअकोला, दि. ५- विदर्भातील विद्यार्थ्यांंच्या सोयीसाठी शासनाने अकोला येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे; पण महाविद्यालयासाठी लागणारी जागाच अद्याप मिळाली नसल्याने, नवीन पदवी महाविद्यालयाचे काम रखडले आहे. त्यामुळे पश्‍चिम विदर्भातील विद्यार्थ्यांंना नागपूर, पुण्याला प्रवेश घ्यावा लागला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर याकडे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील विद्यार्थ्यांंकडून केला जात आहे.अकोला व जळगावला राज्य शासनाने पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले आहे. महाविद्यालयाची इमारत, प्रयोगशाळेसाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला दहा कोटी रुपये निधी दिला आहे. वर्‍हाडातील अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून असल्याने त्या दृष्टीने मागील अर्थसंकल्पात हा विचार करू न विद्यार्थ्यांंना प्रवेश घेण्यासाठी अकोला व जळगाव खान्देश येथे महाविद्यालय मंजूर केले आहे. महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय नागपूर येथे झाल्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेली स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्था पशुविज्ञान विद्यापीठाला जोडण्यात आली. या संस्थेत केवळ पदव्युत्तर शिक्षण देण्यात येते. अकोल्याच्या पशुवैद्यकीय विज्ञान संस्थेत पदव्युत्तर शिक्षणासह पीएचडी करायची असेल, तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे आहे; परंतु नागपूर येथील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय सोडले, तर विदर्भात दुसरे पदवी महाविद्यालयच नव्हते. याच पृष्ठभूमीवर येथील स्नातकोत्तर संस्थेला पदवी महाविद्यालय देण्यात आले आहे. व्हेटरनरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषानुसार, महाविद्यालयाला जागा हवी आहे. अकोल्यात स्नातकोत्तर पशुवैद्यक व विज्ञान संस्थेची जागा आहे, तेथे एमएससी ते पीएचडीपर्यंंतचा अभ्यासक्रम आहे. बीएससी व्हेटरनरीच्या प्रथम वर्षाला ६0 विद्यार्थी प्रवेश क्षमता राहणार असल्याने स्वतंत्र महाविद्यालयासाठी जागा हवी आहे. पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांंचा असल्याने ३00 विद्यार्थी येथे असतील. उर्वरित स्नातकोत्तर अभ्यासक्रमाचे १२0 विद्यार्थी म्हणजेच जवळपास ५00 विद्यार्थी येथे शिक्षण घेणार आहेत. त्यांच्याकरिता सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान व वसतिगृहाची गरज भासणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने जागेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे; परंतु अद्याप जागेचा प्रश्न सुटला नसल्याने, यावर्षी तरी विद्यार्थ्यांंना येथे प्रवेश मिळणे कठीणच आहे.- पदवी महाविद्यालयासाठी शासनाने निधी दिला आहे. जागेसाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे; परंतु अद्याप जागेसाठीची मंजुरी मिळाली नाही; पण लवकरच मिळेल आणि प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.- डॉ. आदित्यकुमार मिश्रा,कुलगुरू ,महाराष्ट्र पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठ, नागपूर.