शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मोटर वाहन कायद्याचे अद्याप परिपत्रक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 14:03 IST

राज्य शासनाने राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांना नवीन मोटर वाहन कायद्याचे परिपत्रकच पाठविले नाही.

अकोला: केंद्र सरकारच्या नव्या मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीचे परिपत्रक अद्याप अकोला पोलिसांना प्राप्त झाले नसल्याची माहिती असून, त्यामुळे सोमवारीदेखील अकोल्यात नवीन मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक किंवा कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.नवा मोटर वाहन कायदा जुलैमध्ये संसदेत मंजूर झाला. त्यानंतर १ सप्टेंबरपासून त्याची देशभर कठोर अंमलबजावणी सुरू झाली. नव्या कायद्यानुसार मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे, विना परवाना गाडी चालविणे, हेल्मेट व सिट बेल्टचे नियम न पाळणे यासाठी पूर्वीच्या तुलनेत पाचपट दंड आकारण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने हा कायदा लागू करण्यात आला आहे. मोक्यावरच ई-चालान ठोकण्यासाठी मशिन्स अद्ययावत करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. अनेक वर्षानंतर मोटर वाहन कायद्यांतर्गत दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांना दंडाची रक्कम मोठी वाटणे स्वाभाविक आहे. अशात वाहतूक पोलिसांसोबत सल्लामसलत करून दंडासंदर्भात नवी अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे; मात्र राज्य शासनाकडून अद्याप तरी नवीन मोटर वाहन कायद्याचे परिपत्रक आले नसल्याची माहिती अकोला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. राज्यातही अंमलबजावणी नाहीच!केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटर वाहन कायद्याचे परिपत्रक राज्य शासनाला केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहे; मात्र राज्य शासनाने राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांना नवीन मोटर वाहन कायद्याचे परिपत्रकच पाठविले नाही. त्यामुळे सध्या तरी राज्यातील जिल्ह्यात जुन्याच मोटर वाहन कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाTrafficवाहतूक कोंडी