शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या ताफ्यात लवकरच नवीन मिडी बस

By admin | Updated: June 1, 2016 01:02 IST

महाराष्ट्राची लोकवाहिनी झाली ६८ वर्षांची : आज प्रत्येक आगारामध्ये विविध कार्यक्रम.

बुलडाणा: ग्रामीण भागातील कानाकोपर्‍यात एसटी पोहोचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच नवीन मिडी (मिनी) बस दाखल होणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे दाखल असून, मंजुरी मिळाल्यास चालू वर्षातच ३२ आसनी ५0 नवीन मिडी बस राज्य परिवहन महामंडळ विकत घेणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या महसुलात वाढ होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.खेड्यापाड्यात मोठय़ा आकाराच्या बस पोहोचणे अवघड असल्याने छोट्या बस उपयुक्त ठरतील तसेच ग्रामीण भागातील गावकर्‍यांना या सेवेचा बराच फायदा होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित नवीन मिडी बस एकूण ३२ आसनी राहणार असून, प्रत्येक बसमागे जवळपास आठ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानुसार ५0 बसमागे महामंडळाच्या महसुलातून तब्बल चार कोटी रुपये रक्कम वजा होणार असल्याचा अंदाज आहे. डोंगराळ भागातील नागमोडी वळणावर छोट्या बस चालविणे अधिक सोयीस्कर असून, इंधनातही बचत होईल, शिवाय प्रवासी भार हलका होण्यास मदत होणार आहे. २0१७ च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापर्यंत नवीन ५0 मिडी बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणे अपेक्षित आहे. दरम्यान, १ जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा ६८ वा वर्धापन दिन असल्याने राज्यभरातील सर्व आगारांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जुन्या मिडी बस सुरू राहणार!सद्य:स्थितीला ४४ आसनक्षमता असलेल्या मिडी बस कार्यरत असून, बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव व मेहकर आगार अंतर्गत त्या फेर्‍या घालत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. याच पृष्ठभूमीवर नवीन मिडी बसचा आकार लहान राहणार असून, त्यामार्फत ग्रामीण भागातील प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार आहे.