शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नवजात नेत्रदात्याच्या पालकांना नेत्रकमल पुरस्कार

By admin | Updated: September 2, 2015 02:29 IST

नेत्रकमलांजली करणार १0५ कुटुंबीयांचा सत्कार.

अकोला : पाच दिवसीय नवजात बालकाच्या मृत्यूनंतर त्या बालकाचे नेत्रदान करण्याचा निर्णय त्याचे वडील धनंजय सोनोने यांनी घेतल्याने नेत्रदान चळवळीला आदर्श निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने नेत्रकमलांजलीच्या वतीने सोनोने कुटुंबीयांना यंदाच्या नेत्रकमल पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे डॉ. चंद्रकांत पनपालिया यांनी सांगितले. राष्ट्रीय नेत्रदान दिनानिमित्त ६ सप्टेंबर रोजी नेत्रकमलांजलीच्या वतीने नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांच्या सन्मान सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. चंद्रकांत पनपालिया बोलत होते. आयोजित सोहळ्य़ामध्ये जालन्यातील फालेगाव येथील धनंजय सोनोने यांना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते नेत्रकमल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सोनोने यांनी त्यांच्या पाच दिवसीय बालकाच्या मृत्यूपश्‍चात त्याचे नेत्रदान करून नेत्रदान चळवळीसाठी आदर्श ठेवला आहे. तसेच या व्यतिरिक्त १0५ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांना गौरविण्यात येणार असल्याचे डॉ. पनपालिया यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेला डॉ. श्याम पनपालिया, सुधीर रांदड, जीवनलाल राठी, अरविंद सोनी यांची उपस्थिती होती.