शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘नेट कनेक्टिव्हिटी’मध्ये अडकला ‘आॅनलाइन’ सातबारा!

By admin | Updated: July 15, 2017 01:37 IST

शेतकऱ्यांना हेलपाटे : त्रुटी दुरुस्तीचे काम ९९ टक्क्यांवर

संतोष येलकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘आॅनलाइन’ सात-बाराचे वितरण करण्यात येत आहे. आॅनलाइन झालेल्या सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे कामही ९९ टक्के पूर्ण करण्यात आले; मात्र ग्रामीण भागात ‘नेट कनेक्टिव्हिटी’च्या अभावात आॅनलाइन सात-बारा वितरणात अडचणी निर्माण होत असल्याने, सात-बारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे सात-बारा ‘आॅनलाइन’ झाला; पण ‘नेट कनेक्टिव्हिटी’मध्ये अडकल्याचा प्रत्यय येत आहे.जिल्ह्यातील हस्तलिखित सात-बाराचे वितरण गत २०१२ पासून बंद करण्यात आले असून, २०१३ पासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ‘आॅनलाइन’ पद्धतीने सात-बारा देण्याचे काम सुरू करण्यात आले. अद्ययावत आॅनलाइन सात-बारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी संगणकीकृत करण्यात आलेल्या ३ लाख ५३ हजार ८०३ सात-बारामधील चुका, त्रुटी दुरुस्तीचे महसूल विभागाकडून सुरू करण्यात आलेले काम १० जुलैपर्यंत ९९.२७ टक्के पूर्ण करण्यात आले. शेतकऱ्यांना आॅनलाइन सात-बारा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यात महसूल मंडळाच्या ठिकाणी ५० ठिकाणी ‘वर्क स्टेशन’ सुरू करण्यात आले; परंतु ग्रामीण भागात सातत्याने निर्माण होणारा ‘नेट कनेक्टिव्हिटी’चा अभाव आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना तातडीने आॅनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. वेळेवर सात-बारा मिळत नसल्याने, आॅनलाइन सात-बारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे चकरा माराव्या लागत असून, नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यानुषंगाने सात-बारा आॅनलाइन झाला तरी, नेट कनेक्टिव्हिटीमध्ये अडकल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. आॅनलाइन सात-बारा वितरणातील अशा आहेत अडचणी!ग्रामीण भागात आॅनलाइन सात-बारा वितरणात अनेक अडचणी येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने नेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, वेबसाइट उघडण्यासाठी पासवर्ड कधी लॉगिंग होतो कधी होत नाही. नेट कनेक्टिव्हिटीअभावी वारंवार वेबसाइट बंद पडणे अशा अनेक अडचणी आॅनलाइन सात-बारा वितरणात निर्माण होत असल्याने, शेतकऱ्यांना आॅनलाइन सात-बारा मिळविण्यासाठी विलंब सहन करावा लागत आहे.आॅनलाइन सात-बारा वितरणाचे असे आहेत ‘वर्क स्टेशन’!जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आॅनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यात ५० ‘वर्क स्टेशन’ सुरू करण्यात आले. या वर्क स्टेशनमध्ये संबंधित तलाठ्यांकडून शेतकऱ्यांना आॅनलाइन सात-बाराचे वितरण केले जाते. त्यामध्ये अकोला-१०, अकोट-८, तेल्हारा -६, बाळापूर-७, पातूर -५, मूर्तिजापूर -८ आणि बार्शीटाकळी तालुक्यातील ६ वर्क स्टेशनचा समावेश आहे.