शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नेरधामणा बॅरेज अडकले लालफितशाहीत;  कंत्राटदाराला सहा वर्ष विनादंड मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 6:50 PM

अकोला : अकोला जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत नेरधामणा बॅरेजचे काम लालफितशाहीत अडकले असून, या बॅरेजच्या पुढील कामासाठीच्या अनेक अडचनी कायम असल्याने मागील २०१२ पासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड न आकारता काम करण्यासाठी मुदत वाढ देण्याची पाळी पाटबंधारे कार्यालयावर आली.

ठळक मुद्दे२००९ मध्ये ज्यावेळी नेरधामणा बॅरेजचे काम सुरू झाले त्यावेळी १८५ कोटी रू पये किंमत होती तीन वर्षात हे बॅरेज बांधून पुर्ण करणे क्रमप्राप्त होते. पाटबंधारे विभागाकडून होत असलेल्या अनेक तांत्रीक कामांच्या विलंबामुळे या बॅरेजची किंमत आजमितीस ६५० कोटींचा झाला आहे.दरम्यान,असे सर्व असताना २०१२ पासून सहा वर्ष कंत्राटदराला विना दंड मुदत वाढ देण्यात आली.

- राजरत्न सिरसाट

अकोला : अकोला जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत नेरधामणा बॅरेजचे काम लालफितशाहीत अडकले असून, या बॅरेजच्या पुढील कामासाठीच्या अनेक अडचनी कायम असल्याने मागील २०१२ पासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड न आकारता काम करण्यासाठी मुदत वाढ देण्याची पाळी पाटबंधारे कार्यालयावर आली. कंत्राटदारामुळे कामास विलंब झाल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना दंड आकारू न मुदत वाढ देणे क्रमप्राप्त होते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे मात्र बॅरेजची किंमत प्रचंड वाढली आहे.२००९ मध्ये ज्यावेळी नेरधामणा बॅरेजचे काम सुरू झाले त्यावेळी १८५ कोटी रू पये किंमत होती तीन वर्षात हे बॅरेज बांधून पुर्ण करणे क्रमप्राप्त होते. पण २०११ ते २०१४ पर्यत निधीच नसल्याने काम बंद होते. या ९ वर्षात पंप हाऊसचे डिझाईन झाले नाही, मुख्य जलवाहीनीचे कामही जमीन उपलब्ध नसल्याने झाले नाही. या शिवाय महाराष्टÑ जलसंपती नियमन प्राधीकरणाने स्थगिती दिल्याने पाटबंधारे विभागाने मंजुरी देण्याचे टाळले परिणामी या बॅरेजच्या कामाची गती खुंटली. पाटबंधारे विभागाकडून होत असलेल्या अनेक तांत्रीक कामांच्या विलंबामुळे या बॅरेजची किंमत आजमितीस ६५० कोटींचा झाला आहे.आताही हे काम संथगतीने सुरू असून,डीझाईनच नसल्याने संथगतीने होत असलेले पंप हाऊसचे काम पंधरा दिवसात बंद पडणार असल्याचे संकेत आहेत. शेतकºयांच्या शेतात सिंचनासाठी पाणी पुरविण्यासाठीच्या वितरण व्यवस्थेच्या कामाची तर अद्याप सुरू वातच झाली नाही.अद्याप या कामासाठीच्या निविदाच काढल्या नाहीत.या वितरण व्यवस्थेच्या भूमीगत जलवाहिनींचे कामही १०० ते १५० कोटींचे आहे.जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यानी २०१५ पासून आतापर्यंत वारंवार या बॅरेजला भेट दऊन पाहणी केलेली असून, प्रलंबीत कामे त्वरीत निकाली काढण्यासाठीच्या निरीक्षण टिपणी सुध्दा येथील पाटबंधारे मंडळ व विभागाला दिलेल्या आहेत.पंरतु याबाबत आतापर्यत या विभागाने कोणतेच पाऊल उचलले नसल्याचे वृत्त आहे.दरम्यान,असे सर्व असताना २०१२ पासून सहा वर्ष कंत्राटदराला विना दंड मुदत वाढ देण्यात आली. या मागचे कारण काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.आणखी हे काम करणाºया कंत्राटदारास दंड आकारलेला नाही हे विशेष. 

कंत्राटदराने काम बंद ठेवल्याने त्यास दंड आकारण्याची सुचना अकोला पाटबंधारे मंडळ अधिक्षक अभियंत्याला केलेली आहे.बॅरेजचे काम पुर्ण व्हावे,यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.- संजय घाणेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा, अमरावती.

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज