शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
3
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
4
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
5
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
6
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
7
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
8
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
9
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
10
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
11
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
12
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
13
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
14
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
15
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
16
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
17
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
18
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
19
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
20
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज

नेहाच्या ऑलिम्पिकवारीत आर्थिक अडचणींचे काटे!

By admin | Updated: February 18, 2015 02:06 IST

लोकमत मदतीचा हात; उच्चस्तरीय प्रशिक्षणाअभावी संधी देऊ शकते हुलकावणी.

अकोला : केवळ राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेतच नव्हे, तर सातासमुद्रापार अकोल्याचे नाव बॉक्सिंगच्या नकाशावर झळकविणार्‍या नेहा अनिल रोठेला आगामी काळात आशियाडसह विश्‍व चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आहे. भारतीय महिला संघात तिला स्थान मिळाले आहे; मात्र तिच्या या प्रगतीच्या वाट्यात आर्थिक अडचणींचे काटे उभे ठाकल्याने तिची प्रगतीची वाट खुंटण्याची शक्यता आहे. बॉक्सिंग या खेळात कधीकाळी केवळ पुरुषांची मक्तेदारी होती. ती मोडून काढत मेरी कोमने भारतीय महिलांना बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याची प्रेरणा दिली. तिच्या पावलांवर पाऊल ठेवत अकोला जिल्ह्यातील अनेक मुलींनी बॉक्सिंग या खेळात कारकीर्द घडविण्यासाठी परिश्रम घेतले. त्यातूनच नेहा अनिल रोठे ही पुढे आली. एक पोलीस कर्मचार्‍याची मुलगी असलेली नेहा केवळ बॉक्सिंग या खेळावर प्रभुत्व मिळवूनच थांबली नाही, तर २0११ पासून तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने महिलांच्या ८१ किलोपेक्षा अधिक वजनाच्या सुपर हेविवेट गटात सलग सहा वर्षे सुवर्णपदकाची कमाई केली. २0१२ मध्ये तिने राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. त्यानंतर तिच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावतच राहिला. सर्बियामध्ये झालेल्या गोल्डन ग्लोबल आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेतही ती कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. तिच्या उंचावणार्‍या कामगिरीचा आलेख बघून तिला भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले. २0१६ मध्ये आशिया स्पर्धा, २0१८ मध्ये विश्‍व अजिंक्यपद स्पर्धा आणि २0२0 मध्ये होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिला आता तयारी करावी लागणार आहे. या स्पर्धांचा आंतरराष्ट्रीय दर्जा लक्षात घेता, तिला आता उच्चस्तरीय प्रशिक्षणाची आवश्यकता भासणार आहे. हे प्रशिक्षण अकोल्यात उपलब्ध नसल्याने मुंबई आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन तिला प्रशिक्षण घ्यावे लागेल. या प्रशिक्षणावर महिन्याला ६0 ते ७0 हजार रुपये खर्च होतो. हे प्रशिक्षण पूर्ण न केल्यास तिला भारतीय संघातील स्थानही डळमळीत होऊ शकते. या प्रशिक्षणाचा खर्च भागविण्याची क्षमता पोलीस कर्मचारी असलेल्या पित्याच्या क्षमतेबाहेर आहे. यावर्षी याच प्रशिक्षणाअभावी तिची भारतीय संघाकडून खेळण्याची एक संधी हुकली. यापुढे प्रशिक्षण पूर्ण न केल्यास अकोल्यातील एका तरुणीला ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित राहावे लागू शकते.